भाजपसोबत परमवीरसिंग यांचं महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे डील झाले होते ?

भाजपसोबत परमवीरसिंग यांचं महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे डील झाले होते ?

मुंबई   – केंद्रसरकार व भाजपसोबत परमवीरसिंग यांचं महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे डील झाले होते त्यातूनच अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप लावण्यात आले. आता केंद्रीय यंत्रणा परमवीरसिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न करतेय मात्र एक दिवस एनआयएला खरं काय आहे हे सांगावं लागेल. सत्य जास्त दिवस लपून राहणार नाही असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मांडले आहे.

परमवीरसिंग यांने खोटे आरोप आणि राजकीय षडयंत्र करुन अनिल देशमुख यांना फसवलं आहे. सरकारला व अनिल देशमुख यांना बदनाम करण्याचा दुरुपयोग केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून झाला असेही नवाब मलिक म्हणाले. या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने चांदीवाल आयोग नेमला असून या आयोगासमोर सचिन वाझे याने अनिल देशमुख यांना पैसे दिले नाही असा जवाब नोंदवला असल्याचे समोर येत आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

परमवीरसिंग यांनी जिलेटीनचे जे कांड केले त्यामध्ये एनआयएने परमवीरसिंग यांचा जवाब नोंदविल्यानंतर ते फरार झाले. मात्र एनआयएने चार्जशीटमध्ये जो मास्टरमाईंड आहे तो कोण आहे हे सांगितले पाहिजे. एनआयएने अद्याप त्यावर चार्जशीट का दाखल केली नाही परमवीरसिंग यांच्या घरात शर्मा आणि वाझे यांची बैठक का झाली. त्यांचं नाव घेतलं जातं, ड्रायव्हरचा जवाब सांगितला जातो, इनोव्हा गाडीची चर्चा होते मात्र परमवीरसिंगच्या नावाची चर्चा होत नाही. एनआयए केंद्रसरकारच्या दबावाखाली परमवीरसिंग यांना वाचवतेय हे सत्य आहे असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

Previous Post
हिंमत असेल तर विधानसभा अध्यक्ष निवडणूक गुप्त मतदानाने घ्या; चंद्रकांतदादांचे महाविकास आघाडीला आव्हान

हिंमत असेल तर विधानसभा अध्यक्ष निवडणूक गुप्त मतदानाने घ्या; चंद्रकांतदादांचे महाविकास आघाडीला आव्हान

Next Post
विधान परिषद निवडणुकीत आमचा उमेदवार गरीब होता,भाजपाचा उमेदवार आर्थिकदृष्ट्या बलाढ्य होता - कॉंग्रेस

विधान परिषद निवडणुकीत आमचा उमेदवार गरीब होता,भाजपाचा उमेदवार आर्थिकदृष्ट्या बलाढ्य होता – कॉंग्रेस

Related Posts
Nana Patole

देशाच्या GDP चे वाट्टोळे करून मोदी सरकार DP बदलायला सांगत आहे

मुंबई –महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) नेतृत्वाखाली ब्रिटिश सत्तेला ‘भारत छोडो’ (Bharat Chhodo Andolan) जनआंदोलनाचा नारा दिला त्यावेळी भाजपची…
Read More
मनोज जरांगेंनी बोलावली इच्छुक उमेदवारांची बैठक;उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार

मनोज जरांगेंनी बोलावली इच्छुक उमेदवारांची बैठक;उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार

Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंनी आज अंतरवाली सराटी येथे इच्छुक उमेदवारांची बैठक बोलावली आहे.या बैठकीत जरांगे उमेदवारांसोबत…
Read More
पावसामुळे संत्रा गळती नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत | Ajit Pawar

पावसामुळे संत्रा गळती नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत | Ajit Pawar

Ajit Pawar | वरुड परिसरात गेल्या कालावधीमध्ये पावसामुळे झालेल्या संत्रा पिकाच्या नुकसान भरपाईचे पंचनामे तातडीने करावेत, असे निर्देश…
Read More