नवाजुद्दीनने अर्ध्या रात्री पत्नी आणि मुलांना काढले घराबाहेर, व्हिडिओ शेअर करत आलिया म्हणाली…

नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आणि त्याची पत्नी यांच्यात सुरू असलेले ‘घरगुती भांडण’ आता घराबाहेर, रस्त्यावर आले आहे. नवाजच्या पत्नीने (Nawazuddin Siddiqui Wife) इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे की, तिला रात्री 11.30 वाजता नवाजच्या बंगल्यातून बाहेर काढण्यात आले आहे आणि व्हिडिओमध्ये ती आपल्या दोन मुलांसह रस्त्यावर उभी असल्याचे दिसत आहे. आलिया सिद्दीकी (Aliya Siddiqui) व्हिडिओत तिच्या मुलांच्या काळजीने भावनिक झाल्याचे दिसत आहे.

व्हिडिओमध्ये आलिया सिद्दीकी म्हणतेय की, ‘मी यावेळी नवाजच्या बंगल्याबाहेर आहे. आम्हाला या बंगल्यातून हाकलून देण्यात आले आहे. ती माझी मुलगी रडत उभी आहे. खूप काळजी वाटतेय. आता मला काही समजत नाही, माझ्याकडे फक्त 81 रुपये आहेत, माझ्याकडे ना हॉटेल आहे ना घर आहे. मी काय करू. मला समजत नाही की नवाज इतका खाली कसा पडू शकतो, मी कल्पनाही करू शकत नाही.’

मी नवाजला कधीच माफ करू शकणार नाही. माझ्या मुलांचे तू किती हाल करत आहेस. माझ्या मुलाची स्थिती काय होत आहे, ते मला तुम्हाला दाखवायचे आहे, असेही आलिया पुढे व्हिडिओत म्हणाताना दिसतेय.

https://www.instagram.com/p/CpULOBjDnm4/?utm_source=ig_web_copy_link

आलियाने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ती 40 दिवसांपासून नवाजच्या घरी राहत होती, पण काल ​​वर्सोवा पोलिसांनी तिला अर्जंट कामासाठी पोलिस स्टेशनला बोलावले. पोलिस स्टेशनवरुन परत आली तेव्हा नवाजुद्दीनने घरी अनेक गार्ड्स ठेवले होते, ज्यांनी तिला घरी परत येऊ दिले नाही. आलिया म्हणते की, वडिलांची ही कृती पाहून माझी मुलगी खूप रडत आहे.