आजच्या संकल्प सभेतून राष्ट्रवादीचा भविष्यात मुख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा – धनंजय मुंडे

कोल्हापूर – राष्ट्रवादीने नेहमी कोल्हापूरातून भरारी घेतली होती आणि आता राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचा समारोप (Conclusion of NCP Family Dialogue Yatra) या संकल्प सभेच्या माध्यमातून कोल्हापूरातून होत असून पुन्हा एकदा राष्ट्रवादी भरारी घेईल असा विश्वास कोल्हापुरातील सभेत बोलताना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Social Justice Minister Dhananjay Munde) व्यक्त केला.

अठरा पगड जातीचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) जसे केले तेच काम आज अठरा पगड जातीधर्माला घेऊन पवारसाहेब काम करत आहेत असेही धनंजय मुंडे म्हणाले. रा.सू गवई (Ra.Su Gawai), प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar), रामदास आठवले (Ramdas remembered) यासारख्या नेत्यांना खासदार बनवण्याचे काम पवारसाहेबांनी संसदेत पाठवून केले आहे.

आम्ही तीन मिनिटात हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणतो तुम्ही कागद न घेता तीस मिनिटात म्हणून दाखवा आहे हिम्मत असे आव्हान देतानाच हल्ली हनुमानाचे नव्याने भक्त निर्माण झाले आहेत असा जोरदार टोला धनंजय मुंडे यांनी लगावला. ईडी मागे लागल्याने काही जणांना सिडी लावावी लागली परंतु नंतर तीच सिडी लपवून ठेवण्याची वेळ काही जणांवर आली अशी खोचक टिका धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे नाव न घेता केली.आजच्या संकल्प सभेतून राष्ट्रवादीचा भविष्यात मुख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.