नाथाभाऊंच्या मनातून काही भाजप जाईना ?, वाचा नेमकं काय घडलंय…

जळगाव : भाजपच्या स्थापनेपासून भाजपचे सक्रीय कार्यकर्ते हे बोटावर मोजण्याइतके आता उरले आहेत. त्यात काहीदिवसांपर्यंत राज्यातील एक नाव सर्वात पुढे होते. ते म्हणजे एकेकाळचे भाजपचे दिग्गज आणि आता राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे.

एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पण असं असलं तरीदेखील नाथाभाऊंच्या मनातून काही भाजप जात नसल्याचे पाहायला मिळतंय. एकनाथ खडसेंनी 40 वर्षे भाजपात काम केले असून भाजपाकडून मोठ-मोठ्या पदांवर त्यांनी कारकीर्द गाजवली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते ते महसल मंत्रीपदही त्यांनी भूषवले. मात्र, 40 वर्षे एकाच पक्षात निष्ठेनं काम केल्यानंतर नवीन पक्षात जम बसवायला वेळ लागतोच, हेच खडसेंच्या अनावधानाने झालेल्या विधानातून समोर आलं आहे.

त्याच झालं असं की, जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात सहकार पॅनलची अजिंठा विश्राम गृहात बैठक पार पडली. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. त्यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेतेही हजर होते. यै बैठकीनंतर पत्रकारांनी अध्यक्षपदासंदर्भात एकनाथ खडसेंना प्रश्न विचारला होता. त्यावर, या निवडणुकीवर बहिष्कार घातलेल्या भाजपाला तीन वर्ष अध्यक्षपद दिले जाईल, असे खडसेंनी म्हटले. त्यानंतर, जवळच असलेल्या गुलाबराव पाटील यांनी खडसेंना चूक लक्षात आणून दिली. त्यावेळी, एकनाथ खडसेंनी आपण 40 वर्षे भाजपात होतो, त्यामुळे ही चूक होणं साहजिक असल्यांच म्हणताच पत्रकारांसह सगळेच हसायला लागले.

हे देखील पहा