‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांची वृत्ती  महिलांना छळणारी आणि अनादर करणारी आहे’

पुणे : शहरातील अन्नधान्य वितरणच्या विभागीय कार्यालयात पुरवठा निरीक्षक आणि कर्मचारी यांच्यासोबत वाद घालून शिवीगाळ करत महिला अधिकार्‍याचा विनयंभग केल्याप्रकरणी माजी नगरसेवक सुभाष जगताप (रा. महात्मा गांधी सोसायटी , सहकारनगर) यांविरोधात समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Former corporator Subhash Jagtap)  याप्रकरणी अन्नधान्य वितरण कार्यालयातील पुरवठा कार्यालयातील महिलेने फिर्याद दिली आहे.

हा प्रकार 2 जून रोजी सोमवार पेठ येथील जुनी जिल्हा परिषद येथील तिसर्‍या मजल्यावरील कार्यालयात घडला. सुभाष जगताप हे परिमंडळ विभागाचे दक्षता समितीचे सदस्य आहेत. त्यांच्या भागातील नागरिकांचे रेशनकार्ड संबंधातील कागदपत्रे आणलेली होती. यावेळी, फिर्यादी या त्यांच्या सहकारी कर्मचार्‍याशी बोलत असताना जगताप यांनी फिर्यादी यांना मोठमोठ्याने आरडाओरड करत शिवीगाळ केली.
त्यानंतर त्यांना स्पर्श करून मनास लज्जा वाटेल असे वर्तन करून नोकरी घालविण्याची धमकी (Threat) दिली. याखेरीज पाहून घेण्याची धमकी देत त्यांना कार्यालयातील अन्य सहकारी व उपस्थित नागरिकांसमोर अपमानित करून त्यांच्या शासकीय कामकाजात अडथळा केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, आता या मुद्द्यावरून भाजपाचे कोथरूड विधानसभा मतदारसंघ  अध्यक्ष पुनीत जोशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांची वृत्ती  महिलांना छळणारी आणिअनादर करणारी आहे. महिला आयोगाचा अध्यक्ष राजकीय सूडा साठी ज्या पद्धतीने कारवाही करतात तसं आपल्या पक्षाचा नेत्यांनी केलेल्या महिलांवरील अन्याय बाबत तत्परता दाखवणार का हा प्रश्न मला पडतो. असं जोशी यांनी म्हटले आहे.