Devendra Fadnavis : महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अद्याप ठरलेला नसला तरीही 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावर शपथविधी सोहळा होणार असल्याचे जाहीर झाले आहे. तत्पूर्वी सागर बंगल्यावर हालचालींना वेग आला आहे. भाजपचे अनेक नेतेमंडळी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेत आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आज ‘सागर’ बंगल्यावर दाखल झाले. या भेटीनंतर वेगळ्याच चर्चा रंगल्या आहेत.
बाळ्या मामा म्हात्रे यांनी दिच्छा भेट घेतल्याचं सांगितलं आहे. पण या भेटीचा सविस्तर तपशील अद्याप समोर येऊ शकलेला नाही. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या पक्षात काही नेते प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. असं असताना आज बाळ्या मामा म्हात्रे यांनी फडणवीसांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.