गॅस सिलेंडरला फासावर लटकवत राष्ट्रवादीचे पुण्यात आंदोलन

पुणे : केंद्र सरकार अन्यायकारक पद्धतीने करत असलेल्या इंधन व डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले. गॅस सिलेंडरला प्रतीकात्मक पद्धतीने फासावर लटकवत हे आंदोलन करण्यात आले.

२०१४ साली महागाई,बेरोजगारी,भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांचे भांडवल करत भारतीय जनता पार्टी सत्तेत आली. सत्तेत आल्यानंतर मात्र ज्या सर्वसामान्य भारतीयांनी भारतीय जनता पार्टीला सत्तेत बसवले, त्या सर्वसामान्य जनतेचा मात्र भाजपला विसर पडला.त्यावेळेस ३००/- रुपयांना मिळणारा सिलेंडर आज तब्बल १०००/- रुपयांवर गेला आहे. पेट्रोल,डिझेल यांच्या दराने शंभरी पार केली आहे. तरीसुद्धा सातत्याने दररोज हे दर वाढवून सर्वसामान्यांची सामान्यांची लुटमार ही सुरूच आहे. निवडणुका आल्या की दर स्थिर ठेवायचे, निवडणुका गेल्या पुन्हा सर्व सामान्यांच्या खिशावर दरोडा टाकायचा, हीच खरी भाजपची नीती आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी आता भाजपला धडा शिकवण्याची वेळ आली आहे.

इथून पुढच्या काळात येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपच्या उमेदवारास पराभूत करत महागाई विरोधातला हा राग आपण व्यक्त करावा असे आवाहन मी या निमित्ताने केले. यावेळी प्रवक्ते  प्रदीप देशमुख,महिला शहराध्यक्षा सौ.मृणालिनीताई वाणी युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, विधानसभा अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, संतोष नांगरे, आनंद सवाणे, विद्यार्थी शहराध्यक्ष विक्रम जाधव,शहर उपाध्यक्ष संदिप बालवडकर,शहर समन्वयक श्री.महेश हांडे, दिपक कामठे,अब्दुल हाफिज राष्ट्रवादी युवतीच्या प्रिती धोत्रे,अमृता थोरात,सानिया झुंजारराव आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.