कमळाबाईची तसेच महागाईची देवी आरती करत राष्ट्रवादीचे पुण्यात आंदोलन

पुणे –  गेल्या काही महिन्यांपासून महागाईच्या झळा तीव्र झाल्या असून, पेट्रोल-डिझेलसह (Petrol-diesel) अनेक वस्तूंचे भाव सातत्याने वाढत आहेत. घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचे (Gas cylinder) दरही वाढत असून, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात देखील वाढ झाली आहे. आधीच लॉकडाउननंतर (Lockdown) सामान्य माणसाचे जगणे असह्य झाले असताना, आता सरकारने घरगुती सिलिंडरच्या दरात देखील चांगलीच  वाढ केली  आहे.  सिलिंडर महागल्याने गृहिणीचे आर्थिक बजेट (Financial budget) कोलमडणार आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर वाढलेल्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली असून पुण्यात पक्षातर्फे (Pune NCP Agitation) आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी कमळाबाईची तसेच महागाईची देवी अशी आरती करण्यात आली. भ्रष्टाचाराचा धिक्कार असो अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. देशात पेट्रोल-डिझेल दरवाढ (Petrol diesel price hike) सुरूच आहे. तर गॅस सिलिंडरच्या किंमतीतही सातत्याने वाढ होत आहे.

त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. रोजच वाढणाऱ्या इंधनाच्या दरामुळे जगायचे कसे, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. केंद्र सरकारला मात्र याचे काहीच देणेघेणे नाही. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासही त्यांना कोणताही रस नाही. तर दुसरीकडे देशात फारशी महागाई (Inflation) नसल्याचे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी केले होते. अशी वक्तव्ये म्हणजे सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे. या सर्वांचा निषेध म्हणून शनिपार चौकात हे आंदोलन करण्यात आले.असल्याचे राष्ट्रवादीने सांगितले.