प्रदूषण कमी करण्यासाठी युद्ध स्तरावर काम करण्याची गरज – आ. किशोर जोरगेवार

चंद्रपूर – प्रदूषणामुळे चंद्रपूरकरांचे वयोमान 8 ते 10 वर्षाने कमी झाले आहे. येथील प्रदूषण दिवसागणिक धोक्याची पातळी ओलांडत आहे चंद्रपुरातील वायू प्रदूषण आटोक्यात यावे या दिशेने लोकप्रतिनिधी म्हणून माझे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. मात्र हे प्रदूषण कमी करण्यासाठी सामूहिकरीत्या युद्ध पातळीवर काम करण्याची गरज असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

इको-प्रो संस्थेच्या वतीने सावरकर चौक येथे कृत्रिम फुफ्फुस बोर्ड लावण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आज आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर उपक्रमाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

इको-प्रो संस्थेच्या वतीने चंद्रपुरातील हवेचा दर्जा जाणून घेण्यासाठी कृत्रिम फुफ्फुस बोर्ड लावण्यात आले होते. यावेळी आठ ते दहा दिवसात हे कृत्रिम फुफ्फुस काळे झाले. त्यामुळे चंद्रपुरातील हवेतील प्रदूषणाची तिव्रता लक्षात आली आहे. ही चिंतेची बाब असून हे प्रदुषण कमी करण्याच्या उपाययोजना सुचविण्यासाठी सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेण्याचे आवाहन आ. किशोर जोरगेवार यांनी केले आहे. चंद्रपुरात कोळसा वाहतुकीनेही हवेतील प्रदूषणात वाढ झाल्याचे निकष समोर आले असून त्या दिशेनेही उपाययोजना करण्याची गरज आ. जोरगेवार यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर यांचीही उपस्थिती होती. जिल्ह्यातील प्रदूषणावर खासदार बाळू धानोरकर यांचेही लक्ष असून ते जिल्ह्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे आ. जोरगेवार यावेळी म्हणाले. तसेच इको-प्रो च्या या उपक्रमाचे आ. जोरगेवार यांनी कौतुक केले. प्रदूषणामुळे मानवी शरीरातील अवयव प्रभावित होत आहे. याचा सर्वाधीक वाईट परिणाम फुफ्फुसावर होत असल्याचे इको-प्रो च्या या उपक्रमातून स्पष्ट झाले आहे. जिल्हाच्या चारही बाजूने वन आच्छादन असूनही चंद्रपूरकरांना शुद्ध हवेत श्वास घेणे शक्य होत नसने ही चिंतेसह चिंतणाचीही बाब असल्याचे यावेळी आ. जोरगेवार म्हणाले, यावेळी इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे, कॉंग्रेस जिल्हा शहर कमेटी अध्यक्ष रामू तिवारी, यंग चांदा ब्रिगेडचे राशिद हूसेन यांच्यासह इको-प्रो संस्थेच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

‘डेमी रोज’ने शेअर केला टॉपलेस फोटो, फोटो पाहून चाहते म्हणाले…

Next Post
'दोन दिवसांत कामावर रुजु व्हा, नाहीतर निलंबीत कर्मचाऱ्यांवर कायमस्वरुपी बडतर्फीची कारवाई होणार'

‘दोन दिवसांत कामावर रुजु व्हा, नाहीतर निलंबीत कर्मचाऱ्यांवर कायमस्वरुपी बडतर्फीची कारवाई होणार’

Related Posts
Jitendra Awhad

‘हिजाब आणि बुरखा घालून फिरणाऱ्या इतर राज्यात आपण आपली मुलगी पाठवणार आहात का?’

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे असलेले श्रीधर पाटणकर यांच्यावर मंगळवारी (22 मार्च) दुपारी ईडीकडून कारवाई करण्यात…
Read More
Priyanka Chaturvedi | "श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहिलंय, माझे वडील गद्दार आहेत", प्रियंका चतुर्वेदींच्या टीकेने राजकारण तापले

Priyanka Chaturvedi | “श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहिलंय, माझे वडील गद्दार आहेत”, प्रियंका चतुर्वेदींच्या टीकेने राजकारण तापले

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेनेच्या उद्धव गटाच्या नेत्या आणि खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांच्या विधानाने महाराष्ट्रात राजकारणात वादळ…
Read More
Nana_Patole

दडपशाही करून आंदोलन चिरडण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न, जनतेच्या प्रश्नावर संघर्ष करतच राहू : पटोले

मुंबई – देशातील जनता महागाईने त्रस्त असताना केंद्र सरकारने जिवनावश्यक वस्तुंवर जीएसटी (GST) लावून गोरगरिबांच्या तोंडातला घास हिरावून…
Read More