Neelam Gorhe | उबाठा गटाने सत्तेसाठी हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली दिली, नीलम गोऱ्हे यांची टीका

Neelam Gorhe | उबाठा गटाच्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली दिली असून त्यांनी अतिशय बेताल वक्तव्य केलेली आहेत. त्याबाबत शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, राज ठाकरे यांनी काल श्रीकांतजी शिंदे आणि नरेशजी म्हस्के या शिवसेनेच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतली आणि त्या जाहीर सभेमध्ये काय काय प्रकारे राजकारणामध्ये हिंदुत्ववादाला तिलांजली देऊन कशाकशा वेगवेगळ्या कुरघोड्या किंवा तडजोडी केलेल्या आहेत त्याची अनेक प्रभावी अशी उदाहरणे दिली आहेत.

यामध्ये, शिवसेनेच्या एका नव्याने आलेल्या महिला प्रवक्त्यांना सुद्धा कशाप्रकारे त्यांनी मोठ्या साहेबांवर म्हणजे बाळासाहेबांवर अत्यंत अवमानकारक भाष्य केलं होतं तरीसुद्धा त्यांना पवित्र करून घेतलं याच्यावरती सुद्धा त्यांनी लक्ष वेधलेले आहे.

अशाच पद्धतीने समर्थ रामदास स्वामींवर अत्यंत वाईट भाषेमध्ये टीका करणारी व्यक्ती त्याचबरोबर देवी मातेवरती टीका करणारी व्यक्ती अशांचं सुद्धा उघड उघड समर्थन करणाऱ्या लोकांना एवढी प्रतिष्ठा मिळते आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिक जो आहे त्याच्या मानसिकता बदलून त्यांना मोठी सहानुभूती किंवा पाठिंबा जो आहे तो एकनाथ शिंदे यांना मिळतो आहे, कारण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याच काम एकनाथ शिंदे आणखीन शिवसेना करत आहे. त्यामुळे मला खात्री वाटते की लोकांना हे जाणून शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा याचा परिणाम लोकांच्या मनापर्यंत होईल कारण सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी किती भयंकर अशा तडजोडी या शिवसेनेच्या उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आहेत, असे शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप