नवी दिल्ली | शिवसेना (शिंदे गट) नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी पक्षातील पद मिळवण्यासाठी दोन मर्सिडीज गाड्या द्याव्या लागत असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. दिल्लीत सुरू असलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘असे घडलो आम्ही’ या विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, कार्यकर्त्यांना कमी समजण्याचं कारण नाही. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसं आणली जायची. गल्ला गोळा करण्याचं काम त्यांना (शिंदेंना) दिलं होतं. (उबाठांच्या शिवसेनेमध्ये) दोन मर्सिडीज दिल्या की पदं मिळायची, असा सनसनाटी आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो, असंही विधान नीलम गोऱ्हे यांनी केलं.
राजकीय वर्तुळात खळबळ
नीलम गोऱ्हेंच्या (Neelam Gorhe) या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना (उद्धव ठाकरे गट) अडचणीत येऊ शकते. त्यांच्या आरोपांवर शिवसेना (उद्धव गट) काय प्रतिक्रिया देते, याकडे लक्ष लागले आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
मनसे नेत्यांना शिवसेनेत आणण्याचा प्रयत्न? राज ठाकरे संतापले!
शरद पवारांचं राजकारणातलं स्टेटस मोदींपेक्षा मोठं, पंतप्रधानांच्या त्या कृतीनंतर राऊतांची प्रतिक्रिया
आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेत जाणार? भगव्या स्टेटसने राजकीय चर्चांना उधाण