नेता सर्वसामान्यांचा : जगदीश ललित आगरवाल !

jagdish agrwal

नेता सर्वसामान्यांचा : जगदीश आगरवाल यांचा जन्म करमाळा शहरातील एका संस्कृत संप्पन हॉटेल व्यावसायिक कुटुंबामध्ये सन 1985 साली झाला. लहानपणापासूनच त्यांना समाजकारणाची आवड त्यांना होती. त्यांचे वडील करमाळ्याच्या हॉटेल रामभरोसेचे मालक ललितशेठ लक्ष्मीनारायण आगरवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक असल्याने त्यांच्या कुटुंबामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे विचार व राष्ट्रप्रेमी भाव सहृदयता असल्यामुळे आपण समाजासाठी व देशासाठी काहीतरी करावे ही भावना जगदीश यांच्यामध्ये होती.

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशा म्हणीप्रमाणे जगदीश आगरवाल यांनी आपले बारावी नंतर हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करुन शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत संघाच्या विचाराचा आदर्श घेऊन आपला हॉटेलचा व आईस्क्रीम व्यवसाय सांभाळून समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा हे ब्रीद आपल्या जीवनात अवलंबण्यास सुरुवात केली. सुरूवातीच्या काळात युवकांचे संघटन उभा करून केशव प्रतिष्ठानची स्थापना करून या मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव, मोफत रुग्णवाहिका, रक्तदान शिबीर, वारकरी लोकांना दिंडीला अन्नदान, आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील मुलांना दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहकार्य केले आहे.

त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व केशव प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेल्या कामाची पोचपावती म्हणून भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष पदी त्यांची निवड करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे काम करत समाजसेवेचे व्रत जपण्याचे काम त्यांनी केले आहे.. कोरोना या महामारीच्या या संकटकाळात करमाळा तालुक्यातील डाॅक़्टर अचानक लाॅकडाऊन झाल्यामुळे उझेबेकीस्तान येथे अडकुन पडले होते त्या लोकांना भारतात परत आणण्यासाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून त्यांना परत भारतात आणण्याचे काम जगदीश आगरवाल यांनी केले आहे.

कोरोना महामारीच्या या संकटकाळात पोलिस बांधव आपल्या संरक्षणासाठी रात्रंदिवस ड्युटी करून आपले कर्तव्य पार पाडत आहे अशा लोकांना माणुसकीच्या नात्याने एक मदतीचा हात म्हणून आपल्या हॉटेल रामभरोसे च्या वतीने जगदीश अग्रवाल लोकडाॅऊनपासून सुमारे 50 पोलिस बांधवांना दोन वेळेस जेवणाचा डबा देण्याचा त्यांचा उपक्रम अविरतपणे चालू केला.कोरोनामुळे गरीब कुटुंबातील लोकांवर उपासमारीची वेळ आली असल्याने खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या माध्यमातून करमाळा भारतीय जनता पार्टीचे वतीने करमाळा तालुक्यातील गरजु गरीब कुटुंबातील दोन हजार कुटुंबांना किराणा किटचे वाटप केले आहे.

खासदार रणजितसिंह निंबाळकर व विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे खास निकटवर्तीय म्हणून जगदीश आगरवाल यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. कोरोनामुळे लाॅकडाऊन झाल्यामुळे गेवराईव पाटोदा येथील मुर्तीकार करमाळ्यात अडकुन पडले होते ही बाब लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जगदीश आगरवाल यांनी आपले सहकारी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस दिपक चव्हाण राधेश्याम देवी बजरंग भिंगारे या सहकार्यासह सर्व मजुरांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या मुळ गावी पाठवण्याचे काम केले आहे.

भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जगदीश आगरवाल यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेले काम युवा पिढी समाजासाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या या यशस्वी वाटचालीत त्यांची आई वडील बंधू व पत्नी यांचा सक्रिय सहभाग आहे.समाजकारणात काम करत जनतेच्या मनावर राज्य करणाऱ्या जगाला दिशा देऊन समाजात बदल करण्यासाठी कार्यरत असलेल्या प्रेमळ हसतमुख मनमिळाऊ अष्टपैलू अजातशत्रू व्यक्तिमत्त्व असलेल्या युवक मित्र जगदीश आगरवाल यांच्या कार्यास मनापासून सलाम व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा…

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=XWf3IiUOx0Q

Previous Post
malik - pawar

‘माझ्या जावयाला फ्रेम केल्यानंतर महिने तणावात होतो पण पवारसाहेबांनी माझे धैर्य वाढवले’

Next Post
ajit pawar

उपमुख्यमंत्री अजितदादांनी शब्द पाळला, राज्यातील आमदारांना दसऱ्याचे गिफ्ट

Related Posts

सेकंडहँड गाडी घेताय ? गाडी आपल्या नावावर करून घेताना विमा पॉलिसीही आपल्या नावावर करून घ्या , अन्यथा !

सेकंडहँड गाडी घेताना ग्राहक गाडी आपल्या नावावर करणे जितके महत्वाचे मानतो, तितकाच विमाही ही महत्वाचा मानला पाहिजे.विमा कंपनी…
Read More

क्रिकेटविश्वात पहिल्यांदाच घडले असे, गोलंदाजाने एका चेंडूवर दिल्या चक्क 15 धावा

Oshane Thomas | 2024 वर्ष संपण्यापूर्वी क्रिकेटमध्ये एक आश्चर्यकारक बॉलिंग ॲक्शन पाहायला मिळाली होती, ज्यामध्ये एका बॉलवर एका…
Read More
Business Idea

‘या’ व्यवसायात स्पर्धाही नाही आणि  नुकसान होण्याची शक्यता कमी आहे; फक्त 10,000 रुपयात व्यवसाय करा सुरु 

बिझनेस आयडिया : आजच्या युगात प्रत्येक व्यवसायात जोरदार स्पर्धा असेल. तुम्ही कोणताही व्यवसाय (Business)सुरू कराल, तुम्हाला स्पर्धेला सामोरे…
Read More