महेश मांजरेकरांवर पुन्हा नेटकरी चिडले

मुंबई : ‘बिग बॉस मराठी’ च्या तिसऱ्या पर्वाचा खेळ दररोज अधिकाधिक रंगताना दिसतोय. या सर्वांत लोकप्रिय आणि तितक्याच वादग्रस्त शोमध्ये स्पर्धक गेल्या ५० हून अधिक दिवस राहत आहेत. गेल्या आठवड्यातील चावडीत सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी त्यांच्या मते टॉप २ मध्ये कोणते स्पर्धक असतील, याबद्दल सांगितलं. विशाल निकम हा पहिल्या स्थानी तर जय दुधाणे हा दुसऱ्या स्थानी असू शकतो, असा अंदाज त्यांनी वर्तवला. यानंतर पार पडलेल्या एपिसोडमध्ये जय आणि विकास पाटील यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला आणि वादादरम्यान जय विकासला ‘भिकारी’ म्हणतो. यावरून आता महेश मांजरेकर सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. ते जयसारख्या स्पर्धकाला टॉप २ मध्ये पाहतात, म्हणूनच नेटकरी त्यांच्यावर टीका करत आहेत.

शोमध्ये महेश मांजरेकरांनी जयचं अजिबात कौतुक करू नये, अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे काहींनी त्यांना विकास पाटीलकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिला आहे. ‘जय, मीरा जगन्नाथ आणि उत्कर्ष शिंदे यांचा त्यांच्या रागावर नियंत्रण नाही. ते फक्त घरातील वातावरण दुषित करत आहेत. दादूस यांना तर कधीच घराबाहेर काढायला पाहिजे होतं’, असं एका युजरने लिहिलंय. तर ‘बिग बॉस नेहमीच टीम ए ची साथ का देतं’, असा सवाल दुसऱ्याने केला. ‘विकासकडे दुर्लक्ष करणं बंद करा’, असंही एका युजरने लिहिलं. ‘तुम्ही तुमच्या लाडक्या स्पर्धकांचं कौतुक करणारच. पण जयला माफी मागायला लावा, कारण तो अजूनही बालिश वागतो. तुमच्यामुळे तो विकासला भिकारी म्हणाला. याला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार’, अशी प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी महेश मांजरेकर यांच्यावर टीका केली.

सध्या बिग बॉस मराठीच्या टीम्समध्ये चर्चा होताना दिसणार आहे. बिग बॉसने जाहीर केल्याप्रमाणे काही सदस्यांनी कार्य अनिर्णित कसे ठेवले जाईल या प्रयत्नात दिसले. त्यामुळे ते सदस्य आज शिक्षेस पात्र ठरणार असून त्यांचे वास्तव्य जेलमध्ये असणार आहे आणि याचवरुन घरातील सदस्यांमध्ये चर्चा सुरु आहे. विकास शिक्षेस पात्र आहे, पण मला माहिती आहे ते माझंचं नावं देणार, असं मीरा म्हणते.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

You May Also Like