भारताच्या बँकिंग क्षेत्रात नव्या बँकेचा दमदार प्रवेश, तुमचं खात आहे का या बँकेत?

भारतीय अर्थ जगतात आता आणखी एका बँकेचा समावेश झाला आहे. आरबीआयने एयरटेल पेमेंट बँकेला अनुसूचित बँक म्हणजे शेड्यूल बँक म्हणून दर्जा बहाल केला आहे.1954 अंतर्गत दुसऱ्या अनुसचीत गटात एयरटेलचा समावेश करण्यात आला आहे. ठेवीदारांच्या सुरक्षितेसाठी आरबीआय अनुसचीत बँकावर नियंत्रण ठेवते.

एयरटेल पेमेंट बँकेचे रिटेल नेटवर्क सर्वाधिक विस्तृत आहे. प्रत्येक सहा गावांमधील एका गावांमध्ये ही बँक पोहचली आहे. सर्वात वेगाने विस्तारीत होणारी बँक म्हणून एयरटेलचे नाव एक नंबरवर आहे. या बँकेचे 11 कोटीहून अधिक वापरकर्ते आहेत. फास्ट टॅग जारी करण्यामध्ये देखील एयरटेल नंबर एक आहे. या बँकेची उलाढाल 1 हजार कोटीहून अधिक आहे.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पररवानगी मिळणारी पहिली पेमेंट बँक ठरली आहे एयरटेल.