New Cars Launch in 2022 : ऑटोमोबाईल कंपन्या यावर्षी अनेक नवीन मॉडेल्स घेऊन येणार

Mumbai – कोरोना महामारीमुळे पूर्णपणे प्रभावित झालेल्या दोन वर्षांमध्ये ऑटोमोबाईल उद्योग (Automobile industry) यावर्षी सणासुदीच्या हंगामासाठी जोरदार तयारी करत आहे. वाहन विक्रेत्यांची संघटना असलेल्या FADA नुसार, यंदा सणासुदीच्या आधी कंपन्या एकापेक्षा जास्त वाहने बाजारात आणणार आहेत. या सणासुदीच्या हंगामात कंपन्यांना जोरदार विक्रीची अपेक्षा आहे.

ऑटो डीलर्स बॉडी FADA ने आशा व्यक्त केली आहे की कोविड-19 मुळे प्रभावित झालेल्या गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ऑटोमेकर्स यावर्षी सणासुदीच्या हंगामात अधिक संख्येने नवीन मॉडेल्स घेऊन येतील. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स (FADA) चे अध्यक्ष विंकेश गुलाटी (Vinkesh Gulati) यांनी गेल्या वर्षीचा सणासुदीचा हंगाम त्यांच्या किरकोळ भागीदारांच्या व्यवसायासाठी एका दशकातील सर्वात वाईट असल्याचे वर्णन केले.

नॉन-इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंट वगळता, यावेळी मागणीखूप चांगली आहे, असेही ते म्हणाले. तथापि, दुचाकी विक्रीतील मंदी वाहन उद्योगासाठी सर्वात मोठा ताण आहे. गुलाटी म्हणाले, मागील दोन वर्षांची तुलना केली तर तुम्हाला सणासुदीच्या काळात मॉडेल्सच्या ऑफरच्या दुप्पट तरी दिसेल.असं ते म्हणाले.

याशिवाय, आम्ही बरीच इलेक्ट्रिक वाहने लाँच होताना पाहत आहोत.तथापि, बहुतेक नवीन मॉडेल्स कॉम्पॅक्ट SUV किंवा SUV सेगमेंटमध्ये असण्याची अपेक्षा आहे. ते म्हणाले की नवीन मॉडेल्सपैकी 90 टक्के एसयूव्ही विभागातील असतील. आगामी चार-पाच महिने वाहन विक्रीसाठी सर्वोत्तम असल्याचे सांगून ते म्हणाले की, या काळात देशात सणासुदीचा हंगाम आहे.