‘बिग बॉस’च्या घरात नवा स्पर्धक? सोनाली कुलकर्णीची धमाकेदार एन्ट्री

पुणे : छोट्या पडद्यावर गाजत असलेला लोकप्रिय रिअलिटी शो म्हणजे बिग बॉस मराठी. सध्या या शोचं तिसरं पर्व सुरु असून या घरात सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाची आता स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. आतापर्यंत या घरात आदिश वैद्य आणि नीथा शेट्टी साळवी या दोन स्पर्धकांनी वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. मात्र, या दोघांचाही प्रवास अवघ्या काही आठवड्यांमध्ये संपला. त्यानंतर आता घरात पुन्हा एका नव्या सदस्याची एन्ट्री झाली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धकाच्या एन्ट्रीने घरात एकच गोंधळ उडाला आहे.

कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये घरात चक्क अभिनेत्री सोनाली कुलकर्णी येत असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे  या घरात सोनालीला पाहिल्यावर घरातील प्रत्येक स्पर्धक अचंबित झाला आहे. तर, सोनाली या पुढे या शोचा भाग असेल का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये सोनाली जरी बिग बॉसच्या घरात दिसत असली तरीदेखील ती या शोमध्ये सहभागी होण्यासाठी नव्हे तर तिच्या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आली आहे.