नवीन ऑल्टोचे फोटो झाले लिक, अगदी कमी किमतीत मिळणार ‘हे’ भन्नाट फीचर्स

नवी दिल्ली : नव्या जनरेशनची मारुती ऑल्टो पुन्हा एकदा चाचणी करताना दिसली आहे. या कारचा व्हिडिओ ऑनलाइन लीक झाला आहे. हा या कारचा लोअर वेरिएंट असू शकतो असा अंदाज आहे.

कॅमेऱ्यात कैद झालेल्या कारचे समोरचे प्रोफाईल दिसत नाही, पण त्यात वाढलेले टेलगेट आणि प्रोडक्शन रेडी टेललॅम्प पाहायला मिळत आहेत. नवीन अल्टोमध्ये जुन्या स्पॉटेड मॉडेलप्रमाणेच प्लेन स्टील व्हील्ससोबत दिसत आहे. असा अंदाज आहे की 2022 मध्ये अल्टोला वॅगन-आरच्या हेयरटेक्ट प्लॅटफॉर्मवर तयार केली जाऊ शकते, ज्यामुळे ती सध्याच्या मॉडेलपेक्षा मोठी असू शकते.

Alto new

लिक झालेल्या व्हिडिओमध्ये कारचा आतील भाग दिसत नाही, परंतु अशी अपेक्षा आहे की कंपनी तिच्या फीचर लिस्टमध्ये काही एडिशन नक्की करू शकते. ज्यामध्ये 7-इंच टचस्क्रीन युनिट, फ्रंट पॉवर विंडो आणि कीलेस एंट्री यासारख्या फीचर्सचा समावेश आहे. नवीन Celerio चे काही फीचर्स अल्टोच्या केबिनमध्ये दिले जाऊ शकतात. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यामध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग, EBD सह ABS आणि मागील पार्किंग सेन्सर दिले जाऊ शकतात.

Alto interior

मारुतीची नवीन ऑल्टो कार सध्याच्या मॉडेलच्या (48 PS / 69 Nm) 0.8-लीटर पेट्रोल इंजिनसह 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी दिलेले आहेत. यात पेट्रोल इंजिनसह CNG किट (41 PS/60 Nm) दिले आहे. या नव्या जनरेशनच्या हैचबैक कारमध्ये 1.0-लिटर पेट्रोलसह पर्यायी AMT गिअरबॉक्स देखील दिला जाऊ शकतो.

2022 भारतातील मारुती अल्टोची किंमत रु.3.5 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होऊ शकते. असा अंदाज आहे की ही कार 2022 च्या पहिल्या तिमाहीपर्यंत लॉन्च होऊ शकते. या सेगमेंटमध्ये ऑल्टोची थेट टक्कर ते रेनॉल्ट क्विड आणि डॅटसन रेडी -GO शी आहे.

Alto

हे देखील पहा