मुंबईत आयकॉनिक इमारती उभारण्यासाठी नवीन धोरण; उपमुख्यमंत्री शिंदेंची विधीमंडळात घोषणा

मुंबईत आयकॉनिक इमारती उभारण्यासाठी नवीन धोरण; उपमुख्यमंत्री शिंदेंची विधीमंडळात घोषणा

DCM Eknath Shinde | ब्रिटीशांच्या काळातील काही विशिष्ट इमारतीमुळे मुंबईची एक वेगळी ओळख आहे. जागतिक दर्जाच्या मुंबई शहरात वैशिष्टयपूर्ण आयकॉनिक इमारतींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने नवीन धोरण तयार केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. मुंबईच्या सौंदर्यीकरणामध्ये भर घालतानाच पर्यटनाला चालना मिळेल त्याचबरोबर मुंबईची विशिष्ट ओळख निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

निवेदन करताना उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) म्हणाले, जगातील विविध शहरांना त्यातील विशिष्ट प्रकारची नगररचना पध्दती, परिसर, विशिष्ट इमारती यामुळे वेगळी ओळख निर्माण झाल्याचे दिसून येते. मुंबई शहरात देखील ब्रिटीशांच्या काळातील काही विशिष्ट इमारती असल्याने मुंबईची एक वेगळी ओळख आहे. मुंबई हे एक जागतीक दर्जाचे शहर असून आपल्या देशाला वास्तुकलेचा फार मोठा वारसा आहे. तो जतन करणे आवश्यक आहे. त्यामुळे मुंबई शहरात अशा वैशिष्टयपूर्ण आयकॉनिक इमारती करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. जेणेकरुन शहराच्या सौंदर्यीकरणामध्ये व पर्यटन क्षमता वृद्धिंगत होण्यास हातभार लागेल व त्यामुळे मुंबई शहराची एक विशिष्ट ओळख निर्माण होईल.

विशीष्ट प्रकारच्या इमारतींकरीता मुंबईसाठी सध्या लागू असलेल्या विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील तरतुदींमुळे मर्यादा येत असल्याने अशा वैशिष्टपूर्ण इमारती उभारणे शक्य व्हावे व वास्तुकलेस चालना मिळावी याकरीता आयकॉनिक इमारती करीता नवीन धोरण शासनाने तयार केले आहे. आयकॉनिक इमारती उभारण्यासाठी मुंबईच्या विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमध्ये स्वतंत्र तरतुद समाविष्ट करण्यासाठी नियमावलीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमाचे कलम ३७ (१) अन्वये सदर नियमावलीमध्ये फेरबदल करण्याबाबत मुंबई महानगरपालिकेला निर्देश देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

“OTT प्लॅटफॉर्म, स्टँडअप कॉमेडी शोजमधील आक्षेपार्ह मजकुराबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा”

कुणाल कामरा हा वाह्यात बोलणारा विकृत माणूस – Manisha Kayande

भारतरत्न देताना महात्मा फुले यांचे माहात्म्य कुठेही कमी होता कामा नये – Chhagan Bhujbal

Previous Post
बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाचे काय झाले? अहवालाची लपवाछपवी का? | Harshvardhan Sapkal

बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाचे काय झाले? अहवालाची लपवाछपवी का? | Harshvardhan Sapkal

Next Post
'कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी, मुख्यमंत्री व मंत्र्यांची वर्तणूक संविधानविरोधी'

‘कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी, मुख्यमंत्री व मंत्र्यांची वर्तणूक संविधानविरोधी’

Related Posts
Chhagan Bhujbal

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांनी अधिक सक्रिय होऊन कामाला लागावे – भुजबळ

नाशिक :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांनी अधिक सक्रीय होऊन कामाला लागावे अशा सूचना राज्याचे माजी…
Read More
nikhil wagle

फडणवीस यांचा त्याग वगैरे काही नाही, मालकांचं ऐकावचं लागेल – निखील वागळे 

मुंबई – महाराष्ट्रात इतक्या दिवसांच्या राजकीय उलथापालथीनंतर अखेर एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांना मुख्यमंत्री करण्यात आले.  देवेंद्र फडणवीस (Devendra…
Read More
"धंगेकरांच्या पत्नीच्या नावावरच्या 60 कोटींच्या जमिनीवर भाजप...", संजय राऊतांचा सनसनाटी दावा

“धंगेकरांच्या पत्नीच्या नावावरच्या 60 कोटींच्या जमिनीवर भाजप…”, संजय राऊतांचा सनसनाटी दावा

Sanjay Raut | काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे…
Read More