New Zealand Cricket Team | ट्रेंट बोल्टनंतर आणखी एक स्टार किवी खेळाडू निवृत्त होऊ शकतो

यावेळी न्यूझीलंड क्रिकेट संघासाठी (New Zealand Cricket Team) टी-20 विश्वचषक खूपच वाईट ठरला आहे. किवी संघ साखळी सामन्यांमध्येच सुपर-8 च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. विश्वचषकात किवी संघाच्या अशा खराब कामगिरीने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. न्यूझीलंडने विश्वचषकातील शेवटचा साखळी सामना 17 जून रोजी पापुआ न्यू गिनीसोबत खेळला. न्यूझीलंडने हा सामना 7 विकेटने जिंकला.

या विजयासह किवी संघाचे विश्वचषकातील अभियान संपुष्टात आले. हा सामना वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टचा शेवटचा टी20 आंतरराष्ट्रीय सामना होता. ट्रेंट बोल्टने आता टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता आणखी एक किवी खेळाडू टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो.

टी20I बाबत विल्यमसनची भविष्यातील योजना काय आहे?
टी20 विश्वचषक 2024 च्या शेवटच्या साखळी सामन्यानंतर, न्यूझीलंड संघाचा (New Zealand Cricket Team) कर्णधार केन विल्यमसनला विचारण्यात आले की तो 2026 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहे का? यावर विल्यमसन म्हणाला अरे…मला माहीत नाही. पुढे, विश्वचषक स्पर्धेतील संघाच्या खराब कामगिरीबाबत विल्यमसन म्हणाला की, काही दिवसांतच आम्ही स्पर्धेतून बाहेर पडलो, हे देखील खूपच निराशाजनक आहे. आम्हाला आमच्या विश्वचषक मोहिमेची जोरदार सुरुवात करायची होती पण आम्ही त्यात यशस्वी होऊ शकलो नाही.

शेवटच्या सामन्यात विजय मिळवला
टी20 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडने पापुआ न्यू गिनीसोबत शेवटचा साखळी सामना खेळला. न्यूझीलंडने हा सामना 7 विकेटने जिंकला. या सामन्यात न्यूझीलंडने पापुआ न्यू गिनीला केवळ 78 धावांत गुंडाळले होते. या सामन्यात न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने अप्रतिम गोलंदाजी केली. फर्ग्युसनने या सामन्यात 4 मेडन षटके टाकली आणि 3 बळीही घेतले. अशी कामगिरी करणारा फर्ग्युसन हा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. यानंतर किवी संघाने 12.2 षटकांत 3 गडी गमावून हे लक्ष्य गाठले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like