गोणेगाव येथे पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या हस्ते संपन्न  

मुखेड –  मुखेड तालुक्यातील गोणेगाव येथे दिनांक 5 फेब्रुवारी रविवारी रोजी भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर (BJP District President Venkatarao Patil Gojegaonkar) यांच्या हस्ते पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि प नांदेड, जलजीवन मिशन अंतर्गत असलेल्या या कामासाठी एक कोटी आठ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे.

यावेळी व्यंकटराव पाटील गोजेगावकर म्हणाले, आपल्या गावातील पाण्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असून, आपल्या माता भगिनींच्या प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा होण्याचे स्वप्न आज इथं साकार होत आहे.या कार्यात सहभागी सहभाग घेऊन काम करणाऱ्या नागरिकांचे त्यांनी कौतुक केले. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीने केंद्र व राज्य शासनाच्या योजनेमध्ये सहभागी घेऊन अशा महत्त्वाकांक्षी योजनांमध्ये सहभाग घेण्याचे अवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच याप्रसंगी बबन पाटील गोजेगावकर म्हणाले, गोजेगाव – गोणेगाव हे आपल्यासाठी वेगळं नसून एक जिव्हाळ्याचे नाते गोणेगावकरांसोबत आहे. येथील नागरिकांची सेवा करण्याची संधी वेळप्रसंगी मिळत असते. याचा अभिमान असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रस्ताविक भाषणात ज्ञानेश्वर राजुरे (Dnyaneshwar Rajure) यांनी गोणेगांव गावासाठी ह्या योजनेचे महत्व पटवून सांगितले. यावेळी मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पांदण रस्ते योजनेअंतर्गत तीन किमी अंतराचे दोन रस्ते मजबुतीकरण करण्याच्या कामाचे ही भूमिपूजन करण्यात आले.

याप्रसंगी गोणेगावचे सरपंच लक्ष्मीबाई डोरनाळे, सुरेश सावकार पंदीलवार, बालाजी पाटील गोजेगावकर, दिलीप सुगावे सर, प्रकाश कुंडगिरे बालाजी पाटील कोठारे, विठ्ठलराव नाईक, माधवराव पाटील, व्यंकटराव पाटील इंटग्याळकर, जीवनराव नाईक, सदाशिव बोयवार, बालाजी आप्पा पसरगे, पिंटू पाटील, तलाठी मारुती श्रीरामे, ग्रामसेवक ज्ञानेश्वर श्रीमंगले सह गोणेगांव चे उपसरपंच प्र.अमृतराव दिंडे पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रपाल पाटील, चेअरमन व्यंकटराव देवकते, ग्रामपंचायत सदस्य व्यंकटराव देवकते, नागोराव राजुरे, विठ्ठलराव देवकत्ते, राजाराम देवकत्ते, सेवा सह सो. सदस्य बालाजी पाटील, बालाजी डोरनाळे, हनमंत देवकते, राजाराम राजुरे, मारुती दिंडे, शालेय समीतीचे अध्यक्ष गोविंद दिंडे सह गोजेगाव, आंदेगाव, मारजवाडी, भासवाडी, परतपूर, रावणगाव, मुक्रमाबाद, सांगवी (भादेव) इटग्याळ (पदे), इटग्याळ (पमु), सावळी, बेन्नळ, सावरमाळ, खतगाव, देगाव, रावी, वसुर आदी गावातील सरपंच, पोलीस पाटील, आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रास्ताविक ज्ञानेश्वर राजुरे यांनी केले. आणि आभार संदीप पाटील यांनी केले. सूत्रसंचालन हांडे सर यांनी केले. दरम्यान गोणेगाव गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक याप्रसंगी उपस्थित होते.