विकी-कतरिनाच्या लग्नाच्या बातम्यांमुळे सलमान झाला ट्रोल

दिल्ली : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाच्या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. रोज लग्नाशी संबंधित कोणत्या ना कोणत्या बातम्या समोर येत असतात. अशा परिस्थितीत आता लोकांनी सलमान खानची खिल्ली उडवायला सुरुवात केली असून त्याच्याशी संबंधित मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

विकी आणि कतरिनाच्या लग्नाच्या बातम्यांनी सोशल मीडिया तुडुंब भरला आहे. रोज काही ना काही अपडेट येत राहतात. दरम्यान, सध्या अनेक मीम्स व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये सलमान खानची खुलेआम खिल्ली उडवली जात आहे.