विचारांचा प्रतिवाद विचारांनीच करावा लागेल, शाई फेकून नाही…गिरीश कुबेर यांच्यावरील शाईफेकीचा निषेध – वागळे 

nikhil wagale

नाशिक-  नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली आहे. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक, चुकीची माहिती लिहिल्याबद्दल शाईफेक करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील यांनी म्हटले.

रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.साहित्य संमेलनाच्या मुख्य स्टेजच्या मागच्या बाजूला ही घटना घडल्याची माहिती आहे. गिरीश कुबेर यांच्यावर केलेल्या या शाईफेकीनंतर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान, या सर्व प्रकारावर आता जेष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, विचारांचा प्रतिवाद विचारांनीच करावा लागेल, शाई फेकून नाही.गिरीश कुबेर यांच्यावरील शाईफेकीचा निषेध … असं म्हणत वागळे यांनी पाले मत व्यक्त केले आहे.

दरम्यान, ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात संभाजी महाराजांबद्दल अतिशय आक्षेपार्ह लिखाण असल्याचा दावा संभाजी ब्रिगेडचे नितीन रोटे पाटील यांनी केला. ‘संभाजी महाराजांनी त्यांच्या आईची हत्या केली, असा उल्लेख पुस्तकात आहे. त्याबद्दल संभाजी ब्रिगेडनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आज आमच्या संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाईफेक केली. आम्हाला याचा जराही पश्चाताप वाटत नाही,’ असं रोटे पाटील म्हणाले.

Previous Post
chagan bhujbal

‘संभाजी ब्रिगेड आपली नाराजी निवेदन देऊन व्यक्त करतील असं मला वाटलं होतं’

Next Post
supriya sule

साहित्यिक व पत्रकारांवर अशा प्रकारचे हल्ले निषेधार्ह, कुबेरांवरील शाईफेकीचा तीव्र निषेध – सुळे

Related Posts
आता सर्व मंदिरे ब्राह्मणमुक्त करण्याची वेळ आली आहे - पुरुषोत्तम खेडेकर

आता सर्व मंदिरे ब्राह्मणमुक्त करण्याची वेळ आली आहे – पुरुषोत्तम खेडेकर

बुलढाणा  :   नुकतीच संयोगीताराजे छत्रपती (Sanyogeetaraje Chhatrapati) यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरात पूजा केली.…
Read More
हा पोपट तुरुंगात गेला तर इतर गोष्टी समोर येतील, मलिकांचा वानखेडेंवर हल्लाबोल

हा पोपट तुरुंगात गेला तर इतर गोष्टी समोर येतील, मलिकांचा वानखेडेंवर हल्लाबोल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी “पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त” म्हणत एनसीबीचे…
Read More
Bollywood RakshaBandhan 2024 | सनी देओलने शेअर केला बहिणीसोबतचा फोटो, जेनेलियाने भावाला मारली मिठी; पाहा सेलेब्सनी कसा साजरा केला रक्षाबंधन

Bollywood RakshaBandhan 2024 | सनी देओलने शेअर केला बहिणीसोबतचा फोटो, जेनेलियाने भावाला मारली मिठी; पाहा सेलेब्सनी कसा साजरा केला रक्षाबंधन

Bollywood Celebs Raksha Bandhan 2024 |  संपूर्ण देश आज रक्षाबंधनाचा सण साजरा करत आहे. बहिणी आपल्या भावांना राखी…
Read More