महानगरपालिकेत जनतेच्या मनातला भगवा फडकेल – नीलम गोऱ्हे

nilam gorhe

पुणे : केंद्रात जरी सरकार आपल नसेल तरी राज्यत शिवसेनेचे मुख्यमंत्री आहे आणि येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबई सोबत पुण्यात देखील भगवाच फडकेल अशा विश्वास महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला. गेल्या दीड दोन वर्षांपासून राज्यातील सरकार नागरिकांना हिताचे काम करत असून. त्याच जोडीला तमाम शिवसैनिकांनी उभे केलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, खा. संजय राऊत, सचिन आहिर, शहर प्रमुखाच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेत जनतेच्या मनातला भगवा फडकेल असे प्रतिपादन डॉ. गोऱ्हे यांनी केले.

शिवसेना पुणे पर्वती मतदारसंघ विभाग प्रमुख अमोल रासकर यांच्यावतीने ‘घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा’ आयोजित केली होती. इंदिरा नगर, बिबवेवाडी येथील नागरिकांनी स्पर्धेला उत्फुर्त प्रतिसाद देत जवळपास पाचशेहून अधिक कुटुंबांनी यात सहभाग घेतला. स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते रविवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी बक्षीस वितरण करण्यात आले.या प्रसंगी त्या बोलत होत्या.

दुर्गामाता मंदिर, इंदिरा नगर, बिबवेवाडी पुणे येथे संपन्न झालेल्या या बक्षीस वितरित समारंभाला शहर प्रमुख गजानन थरकुडे, नगरसेवक बाळा ओसवाल, युवासेनेचे किरण साळी, विषेश कार्यकारी अधिकारी पुजा अमोल रासकर, पर्वती मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी, युवासैनिक, परिसरातील नागरिक, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मनसे सहित विविध संघटनेच्या महिलांनी शिवसेनत प्रवेश केला.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=uS6auH2ZXZ8

Previous Post
devendra fadnvis -

‘बंद सरकारचा ढोंगीपणा उघड बंद मागे घेण्यापूर्वी विदर्भ-मराठवाड्यातील शेतकर्‍यांना मदत जाहीर करा’

Next Post
ncp

‘शेतकरी आणि कामगार यांना संपवण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे’

Related Posts
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसच सुपर सीएम; एकनाथ शिंदे फक्त चेहरा :- नाना पटोले

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसच सुपर सीएम; एकनाथ शिंदे फक्त चेहरा :- नाना पटोले

Nana Patole – राज्यातील तिघाडी सरकारमध्ये अंतर्विरोध आहे हे स्पष्ट झाले आहे. एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांच्यात…
Read More
दारूच्या नशेत ऑटोचालकाने मागितले मीटरपेक्षा जास्त पैसे, नकार दिल्याने प्रवाशा चिलारडण्याचा प्रयत्न

दारूच्या नशेत ऑटोचालकाने मागितले मीटरपेक्षा जास्त पैसे, नकार दिल्याने प्रवाशाला चिरडण्याचा प्रयत्न

मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड परिसरात, भाड्यावरून झालेल्या वादानंतर एका ऑटो रिक्षाचालकाने त्याच्या प्रवाशाला (Mumbai Crime) ऑटोने चिरडण्याचा…
Read More
प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा यांचे निधन

प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा यांचे निधन

भोजपुरी लोक गायिका शारदा सिन्हा यांचे निधन (Singer Sharda Sinha) झाले आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास…
Read More