मनसेतून शिंदे गटात आलेल्या नेत्याच्या पत्नीची आत्महत्या, पण कारण काय?
पुणे: मनसेतून शिंदे गटात आलेले निलेश माझिरे (Nilesh Mazire) यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. पुण्यात राहत्या घरी विष प्राशन करून त्यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचं कळतं. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.पत्नीने कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
कोण आहेत निलेश माझिरे ?
मनसेचे पुणे माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्षपद असलेले निलेश माझिरे यांची काही दिवसांपूर्वी पदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर निलेश माझिरे यांच्यासह 400 पदाधिकारी आणि सदस्यांनी मनसेला रामराम ठोकला आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षात अर्थात शिंदे गटात प्रवेश केला होता.