‘एका ड्रग ॲडिक्टसाठी मलिक इतका पिसाळला होता की…’; राणेंची मलीकांवर जहरी टीका

 मुंबई – एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्याशी संबंधित प्रकरणात न्यायालयासमोर तोंडी हमीपत्राचे उल्लंघन करणारे वक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली आहे.

गेल्या सुनावणीत न्यायालयाने कोणतेही वक्तव्य करणार नसल्याची लेखी हमी देऊनही त्याचे हेतुत: उल्लंघन केल्याप्रकरणी तुमच्यावर अवमान कारवाई का केली जाऊ नये अशी विचारणा करत नवाब मलिक यांनी खडसावलं होतं. तसंच १० डिसेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण देण्याचे आदेशही दिले होते.यानंतर आता नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली असून यापुढे कोणतीही विधाने करणार नसल्याची पुन्हा एकदा हमी दिली आहे.

दरम्यान, आता याच मुद्द्यावरून भाजपनेते निलेश राणे तानी मलिक यांच्यावर शरसंधान केले आहे. आपल्या खास शैलीत ट्वीट करत ते म्हणाले, म्हणून जास्त हवेत उडायचं नसतं, ड्रग माफियाला वाचवायला हाच मलिक कारणीभूत आहे, त्या बदल्यात एका अधिकाऱ्याला व त्यांच्या कुटुंबाला उध्वस्त करण्याचं कारस्थान घडवून मलिक यानी स्वतःची प्रतिमा भंगारात मिसळली. एका ड्रग ॲडिक्टसाठी मलिक इतका पिसाळला होता की सांगून सोय नाही. अशी जहरी टीका राणे यांनी मलिक यांच्यावर केली आहे.