‘शेतकरी, कामगार देशोधडीला लागले आणि ठाकरे सरकारचे प्रमुख नेते डान्स करतायत’

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत विवाहबंधनात अडकत आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह होणार आहे. यामुळेच या हायप्रोफाईल विवाह सोहळ्याची सध्या बरीच चर्चा होताना दिसून येत आहे.

दरम्यान, पूर्वशी-मल्हार यांच्या विवाहाच्या निमित्ताने नुकताच संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता. रेनेसाँ या सप्ततारांकित हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं कुटुंबही हजर होतं. मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित संगीत कार्यक्रमात संजय राऊत यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसोबत ठेका धरला. दोघांचा डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता भाजप नेते निलेश राणे यांनी टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, दारू वरची एक्साईज ड्युटी 50% कमी करण्याचं कारण आत्ता समजलं. शेतकरी, कामगार देशोधडीला लागले आणि ठाकरे सरकारचे प्रमुख नेते डान्स करतायत. दोन वर्षात महाराष्ट्राचं वाटोळं करणारं सरकार कसं जनतेच्या छातीवर नाचतं याचं उदाहरण हा व्हिडिओ आहे. या नेत्यांना काही पडली नाही कोणाची. असं म्हणत राणे यांनी जोरदार टीका केली आहे.