विन्या राऊत हा स्वतः दहावी दोनदा नापास… आणि हा मुख्यमंत्री झालेल्या व्यक्तींवर टीका करतो – राणे

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर आता शिवसेनेत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटात सध्या बराच संघर्ष सुरू असून मोठ्याप्रमाणात शिवसैनिक हे द्विधा मनस्थितीत आहेत. स्व. बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांच्या विचारांच्या वारसदाराला साथ द्यावी की रक्ताच्या वारसदाराला मदत करावी असा यक्षप्रश्न सध्या सेनेच्या कार्यकर्त्यांच्या पुढे आहे. अनेकांनी विनंती करून देखील उद्धव ठाकरे हे कॉंग्रेस – राष्ट्रवादीची (Congress – Nationalist Congress) साथ सोडायला तयार नसल्याने नेते मंडळी शिवसेनेला राम राम ठोकत आहेत असं चित्र सध्या दिसत आहे.

दरम्यान, या बंडामुळे शिवसेनेची चांगलीच नाचक्की झाली असून खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी आता मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. ठाणे शहराचा संपर्कप्रमुख असताना मी मध्यस्थी केल्यानेच बाळासाहेबांनी एकनाथ शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती. पण मला आज त्याचा पश्चाताप होत आहे.असं राऊत यांनी म्हटले आहे.

विनायक राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या विद्वत्तेबद्दल संशोधन करावं लागेल. कुणीतरी लिहून द्यायचं आणि ट्वीट करायचं. स्व:तच्या हातानं ट्वीट करता येतं का? याचा अभ्यास करावा लागेल. अशी खोचक टीका राऊत यांनी शिंदे यांच्यावर केली होती. दरम्यान, आता या टीकेला भाजप नेते निलेश राणे (BJP leader Nilesh Rane) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

ते म्हणाले, तो खासदार विन्या राऊत कोण किती शिकलं आणि कोणाला ट्वीट करता येत नाही ते हा सांगतोय, हा स्वतः दहावी दोनदा नापास… जवळपास शिवसेनेच्या बारा वर्षाच्या सत्तेत याला एकदाही साधा राज्यमंत्री केला नाही आणि हा मुख्यमंत्री झालेल्या व्यक्तींवर टीका करतो. असं म्हणत राऊत यांच्यावर टीका केली आहे.