कलानगरला राहणाऱ्या एका सम्राटाने घरातीलच कोंबडी कशी चोरली ? राणेंचा विनायक राऊत यांना सवाल

मुंबई : सध्या शिंदे गट, भाजप आणि शिवसेना (BJP and Shiv Sena) यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचं राजकारण रंगल्याचं पहायला मिळत आहे. आता शिवसेना नेते खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) आणि भाजप नेते निलेश राणे आमने-सामने आले आहेत. विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केली. राऊत यांच्या या टीकेला आता निलेश राणे (Nilesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

विनायक राऊत हिम्मत असेल तर सांग कलानगरच्या सम्राटाने घरातलीच कोंबडी कशी चोरली?? सुनेला कोंबडी समजणारा पहिला सम्राट, कोंबडी कोण माहीत नसेल तर सोनुला विचार. असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.

जर विनायक राऊत बोलले नाहीत तर एक ना एक दिवस आम्ही महाराष्ट्राला सांगणार की कलानगरच्या सम्राटाने घरातलीच कोंबडी कशी चोरली, हे सांगायची आता वेळ आलीय आहे, असा इशारा निलेश राणे यांनी दिलाय. विनायक राऊत यांनी औकातीत राहावं, नाहीतर या ठाकरेंची इज्जत, अब्रू रस्त्यावर आणण्यासाठी कारणीभूत विनायक राऊतच असतील, असा टोलाही निलेश राणे यांनी लगावला.