‘आदित्य सारखा घाबरट आणि पुळचट दुसरा नाही, अरे तुला संरक्षणाची एवढी भीती वाटते तर घरातून बाहेर का पडतो ?’

Aditya Thackeray Security : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या ‘शिव संवाद’ यात्रेचा सातवा टप्पा सुरु असून, मंगळवारी त्यांच्या याच ‘शिव संवाद’ यात्रेच्या कार्यक्रमात औरंगाबादमध्ये गोंधळ पाहायला मिळाला होता. त्यानंतर आता या सर्व प्रकरणाची दखल पोलिसांकडून घेण्यात आली असून, यापुढे आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान अतिरिक्त पोलिस तैनात असणार आहे.  ज्या ठिकाणी संवाद आणि मेळावे होतील त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांकडून अतिरिक्त सुरक्षा पुरवली जाणार आहे.

आदित्य ठाकरे यांच्या ‘शिव संवाद’ यात्रेचा सातवा टप्पा सुरु असून, मंगळवारी औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील महालगावात त्यांची सभा सुरु असताना काही लोकांनी गोंधळ घातला होता. तर आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांची गाडी देखील अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सोबतच आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता. त्यामुळे या सर्व प्रकरणाची दखल पोलिसांकडून घेण्यात आली आहे.

दरम्यान, आता मुद्द्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी टीकास्त्र सोडले आहे. आदित्य सारखा घाबरट आणि पुळचट दुसरा नाही, अरे तुला संरक्षणाची एवढी भीती वाटते तर घरातून बाहेर का पडतो. स्वतःहून हल्ला करायला लावायचा आणि मग पोलीस संरक्षण वाढवून मागायचं. तुम्ही ठाकरे ना मग तुम्हाला पोलीस का लागतात?? हा हल्ला याच्याच लोकांनी घडवून आणलाय याचं संरक्षण वाढवण्यासाठी. असं त्यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले, हा आदित्य इतका बदमाश आहे की स्वतःच्या हितासाठी तो कोणालाही विकू शकतो. आजोबांचा पक्ष यांनी रसातळाला नेला, खरा राग सगळ्यांचा ह्याच्यावर आहे तरी हा निर्लज्ज्यासारखा फिरत असतो. चौकशीत माहिती पडेल हा हल्ला यानेच घडवून आणला आहे, स्वतःचं संरक्षण वाढवण्यासाठी, हा एक नंबर नीच आहे.अशी जहरी टीका त्यांनी केली आहे.