‘कुबेर सारख्या विकृताचे तोंड काळे केले ते आज न उद्या होणारच होतं,ज्यांनी कोणी हे केलं त्यांचं अभिनंदन’

नाशिक : नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली आहे. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक, चुकीची माहिती लिहिल्याबद्दल शाईफेक करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडने म्हटले.

या सर्व प्रकारावर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्रातील जवळपास सर्व महत्वाच्या नेत्यांनी या कृत्याचा निषेध व्यक्त केला आहे. या कृत्याचा निषेध करणाऱ्या नेत्यांमध्ये खा. शरद पवार,खा. सुप्रिया सुळे,मंत्री छगन भुजबळ,खा. संजय राऊत, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आदी नेत्यांचा समावेश आहे. एकाबाजूला दिग्गज नेते या कृत्याचा निषेध व्यक्त करत असताना दुसऱ्या बाजूला भाजपचे नेते निलेश राणे यांनी मात्र या कृत्याचे जाहीरपणे समर्थन केले आहे.

ते म्हणाले, त्रपती संभाजी महाराज यांची लिखाणातून बदनामी करणाऱ्या कुबेर सारख्या विकृताचे तोंड काळे केले ते आज न उद्या होणारच होतं. जे कोणी हे केलं मी त्यांचं अभिनंदन करतो. आमच्या राजघराण्याबद्दल बोलताना औकदित रहायचं.असं राणे यांनी म्हटले आहे.