शिवसेनेने मुंबईच्या सभेत चीन किंवा रशियन लोकं गर्दीत बसवले आहेत असं वाटत होतं’ 

मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून सुरू असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) काय उत्तर देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मुंबईत पार पडलेल्या सभेत त्यांनी अपेक्षेप्रमाणे आपल्या भाषणातून शिवसैनिकांचा (Shivsainik) उत्साह वाढवण्याचा प्रयत्न तर केलाच सोबतच ठाकरे यांनी भाजपाचे हिंदुत्व (Hindutva) , केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर (Misuse of central systems) त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Leader of Opposition Devendra Fadnavis and MNS chief Raj Thackeray) यांचा समाचार घेतला.

दरम्यान,  या सभेवर सत्ताधारी आणि विरोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane)याबाबत बोलताना म्हणाले, शिवसेनेने मुंबईच्या सभेत चीन(China) किंवा रशियन (Russian)लोकं गर्दीत बसवले आहेत असं वाटत होतं, गर्दीत जोश नाही, दम नाही, अर्धे फोन वर, ओसाड गर्दी होती. शाखाप्रमुखांना टारगेट देऊन गर्दी जमवली होती म्हणून जमले तसे उचलून आणले. आज फक्त ‘किंबहुना’ च्या बदल्यात ‘हिंदुत्व’ शब्द होता, बाकी सगळं तेच. असं राणे यांनी म्हटले आहे.