काय उद्धव ठाकरे आता कसं वाटतंय ? निलेश राणेंनी उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली 

Mumbai – महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. (Rahul Narvekar finally becomes the Speaker of the Maharashtra Legislative Assembly) विधानसभेत मोठ्या गदारोळात मतदान पार पडलं. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली.

ते राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष (The youngest Assembly Speaker) ठरले आहेत. शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त 164 मतं मिळाली. तर राजन साळवी (Rajan Salvi) यांना 107 मतं मिळाली. समाजवादी पक्ष (Socialist Party) आणि एआयएमचे आमदार या मतदानात तटस्थ राहिले. एकूण तीन आमदार तटस्थ राहिले. अशा पद्धतीनं नार्वेकर मोठ्या मतांनी विजयी झाले.

दरम्यान,  या घडामोडीनंतर आता भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उरलेल्या शिवसेनेवर टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या (MVA) विधिमंडळ अध्यक्षपदाच्या उमेदवाराला 107 मतं मिळाली, हिशोब लावला तर राष्ट्रवादी (NCP)  व काँग्रेसची (Congress) मतं तशीच्या तशी धरली त्या नंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडे जेमतेम 9 ते 10 आमदार आहेत असं दिसतंय. काय उद्धव ठाकरे आता कसं वाटतंय ? असा सवाल करत ठाकरेंना सुद्धा डिवचले आहे.