‘ज्याला शरद पवार साहेब महत्व देत नाही, ज्याला लोमत्यासारखे वापरतात त्याला आम्ही का महत्त्व द्यायचे?’

तुळजापूर – संजय राऊतांना (sanjay raut) किती महत्त्व द्यायचं हे आता महाराष्ट्रातील राजकारण्यांनी ठरवलं पाहिजे. ज्याला शरद पवार (sharad pawar) साहेब महत्व देत नाही, ज्याला लोमत्यासारखे वापरतात त्याला आम्ही का महत्त्व द्यायचे?, असा सवाल करतानाच संजय राऊतांसारखी माणसं तुमच्या सोलापूरच्या बाजारात खूप भेटतात. विकत मिळणाऱ्या लोकांबद्दल बोलू नये असं म्हणतात, अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर केली.

दाऊद इब्राहीमची बी टीम महाराष्ट्राच्या सरकार मध्ये काम करतेय म्हणून नबाब मलिकांचा राजीनामा घेतला जात नाही असा सनसनाटी आरोप आ. निलेश राणे सोमवारी श्रीतुळजाभवानी मंदीरात देवीदर्शन घेतल्यानंतर पञकारांशी संवाद साधताना केला.

निलेश राणे कुटुंबासह तिर्थक्षेञ तुळजापूरात येवुन श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन करुन देवीची यथासांग पुजा करुन मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पुजेचे पौराहित्य त्यांचे पारंपरिक पुजारी राम विलास छञे यांनी केले.