भाजपाने कितीही फोडाफोडीचे राजकारण केले तरी जनतेचा कौल हा महाविकास आघाडीलाच – पाटील

मुंबई – भाजपाने कितीही फोडाफोडीचे राजकारण केले तरी जनतेचा कौल हा महाविकास आघाडीलाच आहे हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपावर शरसंधान साधले आहे.

नांदेड येथील देगलूर – बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर आज विजयी झाले.

भाजपने केंद्रीय यंत्रणांचा वापर करून महाविकास आघाडीची प्रतिमा मलीन करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी जनतेचा स्वच्छ कौल महाविकास आघाडीलाच आहे हे या निकालावरून सिध्द होते आहे असेही जयंत पाटील म्हणाले.