सोनाक्षी विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

लखनौ – पैसे घेऊन एका कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याबद्दल कायदेशीर कारवाईला सामोरे जाणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या विरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. मुरादाबाद, यूपी येथील ACJM-4 च्या न्यायालयातून वॉरंट जारी करण्यात आले. सतत न्यायालयात हजर न राहिल्याने हे वॉरंट बजावण्यात आले. मुरादाबाद येथील रहिवासी असलेल्या प्रमोद शर्मा यांनी 2018 मध्ये मुरादाबादमधील कटघर पोलिस ठाण्यात सोनाक्षी सिन्हासह पाच जणांविरुद्ध 36 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सोनाक्षी सिन्हाला अटक करून तिला २४ एप्रिल रोजी कोर्टात हजर करण्याचे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत.

याप्रकरणी पुढील सुनावणी 24 एप्रिल रोजी होणार आहे. पैसे देण्यापासून ते विमानाच्या तिकिटापर्यंत पैसे दिलेविमानाच्या तिकिटाचे पैसे भरूनही सोनाक्षी सिन्हा दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी आली नाही, असा आरोप प्रमोद शर्मा यांनी केला आहे. मुरादाबादच्या कटघर पोलीस स्टेशन परिसरात राहणारे प्रमोद शर्मा यांनी चित्रपट अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला टॅलेंट फुलऑन आणि एक्साइड एंटरटेनमेंट कंपनीच्या माध्यमातून इंडिया फॅशन अँड ब्युटी अवॉर्डसाठी आमंत्रित केले होते. हा कार्यक्रम 30 सप्टेंबर 2018 रोजी दिल्लीतील श्री फोर्ड ऑडिटोरियममध्ये होणार होता. सोनाक्षी सिन्हाने यासाठी सोशल मीडियावर एक प्रमोशन व्हिडिओही जारी केला होता.कार्यक्रमाला येण्यासाठी 29 लाख 92 हजार रुपये मोजण्यात आले होते. याबाबत प्रमोद शर्मा यांनी 2019 मध्ये काटघर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती, परंतु तक्रार नोंदवून न घेतल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

खटल्याची नोंद झाल्यानंतर सोनाक्षी सिन्हा या प्रकरणासंदर्भात आपले जबाब नोंदवण्यासाठी 14 ऑगस्ट रोजी मुरादाबादला आली होती. दोन तास हॉटेलमध्ये राहिल्यानंतर तिचा जबाब नोंदवून ती निघून गेली. प्रमोदने या संपूर्ण प्रकरणाची दोन वेळा मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रार केली, त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सोनाक्षी सिन्हावर कलम 420, 406 अंतर्गत आरोपपत्र दाखल केले.