अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस पुन्हा अडचणीत! नोरा फतेहीने दाखल केला मानहानीचा दावा

नवी दिल्ली: सुकेश चंद्रशेखरशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दोन बॉलिवूड अभिनेत्री समोरासमोर आल्या आहेत. नोरा फतेही (Nora Fatehi) हिने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि जवळपास १५ मीडिया कंपन्यांविरोधात दिल्ली कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला आहे.

नोराने आरोप केला आहे की, सुकेश चंद्रशेखरशी संबंधीत २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात तिचे नाव मुद्दाम घेण्यात आले. सुकेशने कधीही तिच्याशी संपर्क साधला नव्हता. ती केवळ सुकेशची पत्नी लीना मारिया पॉलमुळे ओळखते. तसेच सुकेशनचे कोणतेही गिफ्ट घेतले नव्हते. मीडिया ट्रायलमुळे माझ्या अनेक गोष्टींवर परिणाम झाला आहे. जॅकलिन फर्नांडिसने मुद्दाम या प्रकरणात नाव घेतले असून माझी रेप्यूटेशनला धक्का बसला आहे असा थेट आरोप नोराने केला आहे.

२०० कोटी रुपये खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही EDच्या रडारावर होत्या. त्यांची अनेकदा चौकशी करण्यात आली होती. जॅकलिन प्रमाणेच नोरावर देखील सुकेशकडून महागडे गिफ्ट घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. पण चौकशीदरम्यान हे खोटे असल्याचे नोराने सांगितले. सुकेशने नोराला BMW गाडी गिफ्ट म्हणून देण्याचे ठरवले होते. पण नोराने त्याला नकार दिला. सुरुवातीपासूनच नोराला सुकेशवर विश्वास नव्हता. तिने त्याचा फोन नंबर देखील ब्लॉक केला होता.

जॉइन करा आझाद मराठीचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप