फक्त मनसेच नाही, तर एमआयएममध्येही ते जाऊ शकतात; राऊत यांचा बंडखोरांना टोला 

मुंबई – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena leader and minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. ४० शिवसेना आमदार आणि इतर अपक्ष आमदारासमवेत एकनाथ शिंदे गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. भाजपासोबत शिवसेनेनं हातमिळवणी करून सरकार स्थापन करावं अशी अट त्यांनी पक्षाला घातली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Chief Minister Uddhav Thackeray)  हे कदापि शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदेंचा फोन काल थेट ‘शिवतिर्थ’वर गेला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी शिंदेंनी त्यांना फोन केला होता. तसेच दोन वेळा या नेत्यांमध्ये काल फोन कॉल झाला ज्यामध्ये राजकीय चर्चाही झाल्याची माहिती समोर आलीय.

एकनाथ शिंदेंनी थेट राज यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन प्रकृतीसंदर्भातील माहिती घेतली. तसेच राज यांची या दुखण्यापासून लवकर सुटका व्हावी अशा शुभेच्छाही शिंदेंनी दिल्याचं समजतं. या फोन कॉलदरम्यान शिंदे यांनी राज ठाकरेंना राजकीय घडामोडींसंदर्भातील माहिती देताना आपली बाजूही सांगितल्याची माहिती मनसेच्या नेत्यांनी म्हटलंय.

दरम्यान,  मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची फोनवरुन चर्चा  केल्यानंतर शिवसेनेला मिरच्या झोंबल्या आहेत. याबाबत बोलताना बंडखोरांमुळे मनसेला मुख्यमंत्रीपद मिळणर असेल तर ऐतिहासिक गोष्ट असेल, असं ते म्हणाले. तसेच, फक्त मनसेच (MNS) नाही, तर एमआयएममध्येही (MIM) ते जाऊ शकतात, असा टोलाही राऊतांनी लगावलाय. रोड टेस्ट आणि फ्लोअर टेस्टमध्ये आम्हीच विजयी होणार, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.