आता तरी राहुल गांधींचं डोकं ताळ्यावर येईल, चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा

आता तरी राहुल गांधींचं डोकं ताळ्यावर येईल, चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा

Chandrashekhar Bawankule | सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (25 एप्रिल) स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील वादग्रस्त टिप्पणी प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना चांगलंच फटकारलं. यापुढे राहुल गांधी यांनी स्वातंत्र्य सैनिकांबाबत अशी विधानं करू नयेत. तसं केल्यास न्यायालय त्याची स्वत:हून दखल घेईल, अशी तंबी न्यायालयाने राहुल गांधी यांना दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या रणभूमीत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काळ्या पाण्याच्या अंधाऱ्या काळकोठडीतून विचारांचा प्रकाश दिला, त्या महापुरुषांवर राहुल गांधींनी ‘ब्रिटिशांचा सेवक’ अशी टीका करत आपल्या वैचारिक दारिद्र्याची आणि इतिहासद्रोहाची पातळी दाखवून दिली होती.

आज सुप्रीम कोर्टानं जी झणझणीत कानउघाडणी केली ती योग्यच! ही फटकार केवळ न्यायालयीन नाही तर राष्ट्रभावनेचीच प्रतिक्रिया आहे. त्यामुळे आता तरी त्यांचं डोकं ताळ्यावर येईल. अशी अपेक्षा आहे.

https://x.com/cbawankule/status/1915719282090270750?t=ho2YKjF6pt2XenKjo6fPqg&s=19

राहुल गांधींनी आणखी एक लक्षात घ्यावं की, शब्द हे शस्त्र असतात आणि शस्त्र हाताळताना विवेक हवा, अन्यथा ते तुम्हाला जखमी केल्याशिवाय राहत नाहीत, असं बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule) यांनी म्हटले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

‘… तर कडक ॲक्शन घेणार’, शिंदेंचा आमदार फडणवीसांच्या निशाण्यावर

‘हिंदू प्रामाणिक असतात, मी पाकिस्तानकडून खेळलो पण त्यांनी माझ्यावर’, दानिश कनेरियाची भन्नाट पोस्ट

पाण्याचा एकही थेंब पाकिस्तानात जाणार नाही याची खबरदारी घेतली जाईल – Amit Shah

Previous Post
अनिता दाते साकारणार 'जारण'मध्ये साकारणार महत्वपूर्ण भूमिका

अनिता दाते साकारणार ‘जारण’मध्ये साकारणार महत्वपूर्ण भूमिका

Next Post
पहलगाम पीडितांसाठी अनिवासी भारतीयांनी शोकसभेचे आयोजन केले

पहलगाम पीडितांसाठी अनिवासी भारतीयांनी शोकसभेचे आयोजन केले

Related Posts
बाजारात मिळतं एकूण १० प्रकाराचं मीठ, जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते मीठ आहे उत्तम

बाजारात मिळतं एकूण १० प्रकाराचं मीठ, जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते मीठ आहे उत्तम

Which Salt Is Best For Health: मीठाशिवाय जेवणाची चव अपूर्ण असते. जेवणात मीठ कमी किंवा जास्त असल्यास चव…
Read More
Honeymoon

भारतातील 5 अतिशय सुंदर आणि रोमँटिक हनीमून डेस्टिनेशन ज्यांची भुरळ परदेशी लोकांनाही पडलीय

जेव्हा कोणताही भारतीय लग्नानंतर हनिमूनचा विचार करतो तेव्हा बहुतेक विदेशी ठिकाणे आपल्या मनात येतात. पण ज्यांनी जगभर प्रवास…
Read More