ओबीसी आरक्षण : मध्यप्रदेश आणि कर्नाटकात सरकार अडचणीत आल्यावर केंद्र सरकारची याचिका  

मुंबई  – महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाच्या निकालावर केंद्रसरकार गप्प होते मात्र मध्यप्रदेश आणि कर्नाटकात लागू झालेल्या ओबीसी आरक्षण अडचणीत येणार हे लक्षात आल्यावर केंद्रसरकारने फेरयाचिका दाखल केली आहे केंद्रसरकारला ही उशिरा जाग आली आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज केली.

५० टक्क्याच्या मर्यादेमध्ये ओबीसी आरक्षणासहीत निवडणूका घेतल्या पाहिजेत. जोपर्यंत इंपिरिकल डाटा तयार होत नाही तोपर्यंत निवडणूका घेऊ नका ही भूमिका आमची होती असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

आमची ही भूमिका केंद्रसरकारने आता ती स्वीकारली आहे त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट काय निकाल देते हे पहावे लागणार आहे असेही नवाब मलिक म्हणाले. दरम्यान, मलिक यांनी केलेल्या या टीकेला आता भाजप कसे उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.