‘ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उचलला की षडयंत्रकारी लोक मराठा आरक्षणाचा मुद्दा काढतात’

‘ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उचलला की षडयंत्रकारी लोक मराठा आरक्षणाचा मुद्दा काढतात’

औरंगाबाद : औरंगाबादेत आज भाजपच्या ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या उपस्थित होत्या. यावेळी पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडीला चांगलच फैलावर घेतलं आहे.

आता एक नवीन षडयंत्र सुरू झालं आहे. बहुजनांची व्याख्या खराब करण्याचं षडयंत्र सुरू झालं आहे. इकडे ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न कुणी तरी उचलला की तिकडे षडयंत्रकारी लोक मराठा समाजाच्या आरक्षणाच मुद्दा काढतात. अरे मराठा समाजाच्या पाठित खंजीर खुपसणाचं काम तुम्हीचं केलं, असा घणाघात पंकजा मुंडे यांनी केला. ‘ज्या मुख्यमंत्र्यांची जात तुम्ही काढत होतात त्यांनीच मराठा समाजला आरक्षण दिलं. मात्र, या सरकारने ते आरक्षणही संपुष्टात आणलं’, अशी जोरदार टीका देखील पंकजा मुंडे यांनी केली.

तर जातीवाद पूर्वीही होता, जातीवाद आताही आहे. गावामध्ये गेल्यावर जातीवादाच्या भिंती अजूनही दिसतात. संतांच्या महाराष्ट्रात आज ओबीसींची अशी अवस्था का? असा सवालही त्यांनी केलाय. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश न्यायालयात टिकवून दाखवा आणि त्यानुसार निवडणुका घेऊन दाखवा, अशा शब्दात मुंडे यांनी ठाकरे सरकारला ललकारलं आहे.

दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री असल्याच्या वक्तव्यावर देखील पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या,चांगली गोष्ट आहे. आनंद आहे. एखाद्या व्यक्तीला आनंद वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे. लोकांचं प्रेम मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे, असं पंकजा म्हणाल्या. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मीच आहे, असं फडणवीस म्हणाल्याचं पंकजा यांना पत्रकारांनी सांगितलं. त्यावर पंकजा यांनी लगेच त्यावर हसून हरकत घेतली. जनतेच्या मनातला शब्द तुम्ही खेचू शकत नाही, असं त्या म्हणाल्या.

Previous Post
संतांच्या महाराष्ट्रात आज ओबीसींची अशी अवस्था का ?, पंकजा मुंडे कडाडल्या

संतांच्या महाराष्ट्रात आज ओबीसींची अशी अवस्था का? पंकजा मुंडे कडाडल्या

Next Post
अशी घ्या वांग्यांची काळजी अन् घ्या लाखोंचे उत्पन्न !

अशी घ्या वांग्यांची काळजी अन् घ्या लाखोंचे उत्पन्न !

Related Posts

‘लवंगी फटाका त्यांनी फोडला, दिवाळीनंतर बॉम्ब मी फोडणार’

मुंबई – नवाब मलिक यांनी माझी पत्नी अमृता फडणवीस यांची एक सेल्फी जारी केली, त्यासंदर्भात ‘रिव्हर मार्च’ या…
Read More
ramesh deo - thackeray

रमेश देव यांनी सदाबहार आणि मनस्वी कलाकार अशी प्रतिमा आयुष्यभर जपली – उद्धव ठाकरे

मुंबई : मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सदाबहार अभिनयाची छाप उमटवणारा, मनस्वी असा अभिनेता आपण आज गमावला आहे, अशा…
Read More

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड राष्ट्रवादी काँग्रेस कदापि सहन करणार नाही – जयंत पाटील

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) इतिहासाशी संबंधित तथ्यांची मोडतोड राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) कदापि सहन करणार नाही…
Read More