ओबीसींना सरकार कडून न्याय मिळेल हा विश्वास आहे – पंकजा मुंडे

Mumbai – १७ जिल्ह्यांमधील तब्बल ९२ नगरपालिका आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुका (Elections for 92 Municipal Councils and 4 Nagar Panchayats in 17 districts announced) जाहीर करण्यात आल्या आहेत. पर्जन्यमान कमी असलेल्या १७ जिल्ह्यांमधील ९२ नगरपालिका व ४ नगरपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission)  जाहिर केला आहे.

या निवडणुकीची प्रक्रिया २० जुलैपासून सुरु होणार असून १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ ऑगस्ट रोजी मतमोजणी करुन निकाल जाहीर केले जाणार आहेत. दरम्यान, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याने या निवडणुकादेखील ओबीसींच्या आरक्षणाशिवाय पार पडणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.

दरम्यान, आता याच मुद्द्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, काही ठिकाणी नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत… नवनिर्वाचित मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि ओबीसी आरक्षण देऊनच निवडणुका होतील अशी खंबीर पावलं उचलावी .. सरकार कडून न्याय मिळेल हा विश्वास आहे.असं पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

ttps://twitter.com/Pankajamunde/status/1545452833360580608?s=20&t=4hOohc5Kssxi48VyphkgaA