मुंबई, औरंगाबाद आणि बार्शी (जि.सोलापूर) येथील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी केला राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश…

मुंबई दि. २५ नोव्हेंबर – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज मुंबई, औरंगाबाद आणि बार्शी (जि.सोलापूर) येथील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.

पक्ष प्रवेश केलेल्या सर्व नव्या सहकाऱ्यांचे स्वागत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले, तसेच पक्षातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

यावेळी अल्पसंख्याक मंत्री आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक, आमदार सतीश चव्हाण, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, औरंगाबाद ग्रामीण जिल्हाअध्यक्ष कैलास पाटील उपस्थित होते.

औरंगाबाद जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीतर्फे गंगापूर-खुल्ताबाद या विधानसभा मतदारसंघाचे मतदार अंकुश बाबुराव काळवणे यांनी त्यांच्या समर्थकांसहीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत एकलहेरा गावचे उपसरपंच सुदाम अवसरमळ, ग्रामपंचायत सदस्य वाल्मिक गांगर्डे, शेवाळे गावचे सरपंच योगेश पाटील, उद्योगपती प्रमोद मनुरकर आदींनी पक्षप्रवेश केला.

गंगापूर विधानसभा मतदारसंघ निवडून आणण्यासाठी आपल्याला आता प्रयत्न करायचे आहेत. मी सर्व सहकाऱ्यांचे स्वागत करतो. या प्रवेशाने पक्षाला ताकद मिळेल याची खात्री आहे. पुन्हा गंगापूर मतदारसंघ काबीज करण्यात पक्षाला यश येईल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

तसेच माजी आमदार विद्या चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई प्रदेश सरचिटणीस संजय आव्हाड यांच्या संयोजनातून भीम आर्मी आणि आझाद समाज पार्टीचे मुंबई अध्यक्ष दिपक हनवते, उपाध्यक्ष अर्जुन गायकवाड, दहिसर विधानसभा अध्यक्ष विश्वास मोरे, महिला प्रमुख प्रियंका वाघमारे, युवा अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, मुंबई संघटक अक्षय बनसोडे आणि मुंबई उपाध्यक्ष विजय बनसोडे यांनीही पक्षप्रवेश केला.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार नागेशशेठ चव्हाण तसेच त्यांचे सहकारी सोमनाथ चव्हाण, पवन श्रीमाळ, उस्मानाबाद जिल्ह्यातील महेश साळुंखे, गणेश हजारे, अशोक शिंदे, संदेश कापसे, दिनेश साळुंखे, सोहेल शेख, युवराज वाघमारे, सिध्दू रोटे, असीम खान, विकास जाधव, रोहित वेलदरे (पुणे), गोरोबा कदम (वैराग) यांनीही पक्षप्रवेश केला.

बार्शीतील प्रवेशामुळे विधानसभेत चांगली उर्जा निर्माण होईल. मागील विधानसभा निवडणुकादरम्यान काही जणांनी पक्ष सोडला त्यामुळे हा मतदारसंघ भक्कम करण्याचे आवाहन आहे. त्यादृष्टीने हा प्रवेश महत्त्वाचा आहे. यांच्या प्रवेशाने पक्ष वाढीसाठी चांगली मदत होईल असेही जयंत पाटील म्हणाले.