कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरचे कॉंग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे हैद्राबाद येथे उपचारादरम्यान निधन झाले आहे. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून हैद्राबाद येथे उपचार सुरु होते. आमदार चंद्रकांत जाधव यांना दीड वर्षात दोन वेळा कोरोना झाला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळत गेली. गेल्या दिवसांपासून त्यांचावर हैद्राबाद येथे उपचार सुरु होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत जाधव हे कोल्हापूर उत्तर मतदार संघातून कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांनी निवडणुकीच्या आधी केवळ पंधरा दिवस काँग्रेसमध्ये प्रवेश करून शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला होता. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरून दिग्गज नेत्याचा पराभव केल्याने चंद्रकांत जाधव यांची राज्यभर चर्चा होती.

चंद्रकांत जाधव यांचे सर्वच पक्षातील नेत्यांशी जिव्हाळ्याचे सबंध होते. कोल्हापूर शहरातील अनेक तालीम मंडळांशी फुटबॉलच्या माध्यमातून त्यांचा थेट संपर्क होता. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील भरीव कामान त्यांनी दांडगा जनसंपर्क निर्माण केला होता. चंद्रकांत जाधव यांची एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळख होती.

हे देखील पहा