PFI नंतर RSSवर बंदी घालण्याच्या मागणीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या…

सोलापूर  – पीएफआयवरील बंदीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बंदी घालावी, अशी मागणी केली जात आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोलापुरात प्रतिक्रिया दिली. याबाबत बोलताना सुळे म्हणाल्या, मला वाटतं प्रत्येकाची मागणी असते. तर त्याची चर्चा तर झाली पाहिजे. त्यामुळे तो इन्स्टंट टॉपिक नाही. काही गोष्टींवर चर्चा झाली पाहिजे.असं त्यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारनं पीएफआय संघटनेवर बंदी घातल्याप्रकरणी स्पष्टीकरण द्यायला हवं, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. कुठलीही गोष्ट बॅन करताना समाजात त्याची चर्चा झाली पाहिजे. आणि ज्या गोष्टी देशात व्हाव्यात त्या संविधानाच्या चौकटीत व्हाव्या. नियम कायदे सगळ्यांना लागू हवे. पीएफआय़वर जी बंदी घातली आहे त्यावर केंद्र सरकारनं स्पष्टीकरण दिलं पाहिजे.