बीड बायपास रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था उत्तम करा – जिल्हाधिकारी

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील अत्यंत महत्त्वाचा असलेल्या बीड बायपास रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज केली. झाल्टा फाटा ते महानुभवान चौक या 14 कि.मी. रस्त्यादरम्यान होत असलेल्या रस्ते, पूल आदी कामांची प्रत्यक्ष पाहणी करत या रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवावेत, रस्ता दुभाजक, ब्लिंकर्स, हायमास्ट आदींसह पोलिस, महसूल विभागाची चौकी तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी आज अधिकाऱ्यांना केल्या.

पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी चव्हाण यांच्यासमवेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता नरेंद्रसिंग भंडे, उपविभागीय अधिकारी सोमनाथ रोडगे, उप कार्यकारी अभियंता एस. एन. सूर्यवंशी, शाखा अभियंता सुनील कोळसे, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, एम.टी. सुरवसे, तहसीलदार ज्योती पवार, विजय चव्हाण आदींची उपस्थिती होती.

पाहणीची सुरूवात झाल्टा फाटा येथून झाली. याठिकाणी बीड बायपासकडून शेंद्राकडे जाणा-या चौकात हायमास्ट, रस्ता दुभाजकांवरील गवत काढणे, दुभाजकांची रंगरंगोटी करणे, हायमास्टच्या खाली वर्तुळाकार पोलिस आणि महसूल विभागाची चौकी करण्याबाबत संबंधितांना सूचना केल्या. त्यानंतर बाळापूर येथील यार्डला देखील भेट देखत रस्ता कामासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनसामुग्रीची पाहणी श्री. चव्हाण यांनी केली. त्याचबरोबर रस्ते, पुलांची कामे करताना वृक्षतोड होणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घेण्याबाबत निर्देशही चव्हाण यांनी दिले.

देवळाई चौक येथे पोलिसांसाठी रेस्ट रूम, एमआयटी येथील होत असलेल्या पुलाच्या ठिकाणी पाण्याचा शिडकावा करावा, सोलापूर-धुळे महामार्ग खुला झाल्यास बजाज हॉस्पीटलजवळील सुधाकर नगर येथून येणाऱ्या ठिकाणी दूभाजक खुला करण्यात यावा, महानुभाव चौकात झाल्टा फाट्याजवळील चौकीप्रमाणेच पोलिस, महसूल विभागाची चौकी उभारण्यात यावी. शिवाय वाहतुकीला अडसर होऊ नये, अपघात होऊ नयेत याचा विचार करत विजेचे युनिक पोल बसविण्यात यावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी आज अधिकाऱ्यांना केल्या.

https://youtu.be/3AmlxDP4tcU

Previous Post

वयाच्या 46 व्या वर्षी प्रीती झिंटा झाली जुळ्या मुलांची आई

Next Post

अभिनेत्री व फॉर्म्युला फोर कार रेसर ‘मनिषा केळकर’ने अपघातावर मात करत केलं बॉडी ट्रान्सफोरमेशन

Related Posts
दीड कोटी प्राथमिक सदस्यांची नोंदणी करून महाराष्ट्र भाजपाने रचला इतिहास

दीड कोटी प्राथमिक सदस्यांची नोंदणी करून महाराष्ट्र भाजपाने रचला इतिहास

Maharashtra BJP | संघटन पर्वाअंतर्गत भारतीय जनता पार्टीचे दीड कोटींहून अधिक प्राथमिक सदस्य आणि 1 लाख 34 हजारांहून…
Read More
‘सावरकरांनी राजनाथसिंह यांच्या स्वप्नात येऊन माफीनामा का दिला, हे सांगितले का ?’

‘सावरकरांनी राजनाथसिंह यांच्या स्वप्नात येऊन माफीनामा का दिला, हे सांगितले का ?’

मुंबई : विनायक दामोदर सावरकर यांनी महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरून ब्रिटीशांकडे माफीनामा पाठवला हे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे…
Read More
जमीन नावावर करण्यासाठी जन्मदात्या वडिलांचा छळ करीत केले आत्महत्येस प्रवृत्त , मुलासह तिघांवर गुन्हा दाखल

जमीन नावावर करण्यासाठी जन्मदात्या वडिलांचा छळ करीत केले आत्महत्येस प्रवृत्त , मुलासह तिघांवर गुन्हा दाखल

दौंड – जमीन नावावर करण्यासाठी मुलाने मावस भाऊ, चुलता यांच्या मदतीने वडिलांवर वारंवार दबाव आणत मानसिक छळ (Mental…
Read More