विजयादशमी निमित्त गंगाखेड शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पथसंचलन व शस्त्र पूजन

गंगाखेड / विनायक आंधळे :- विजयादशमी उत्सवाचे औचित्य साधून प्रतिवर्षाप्रमाणे यंदा देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे (Rashtriya Swayamsevak Sangh) सघोष व सदंड पथसंचलन उत्साहात पार पडले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गंगाखेड (Gangakhed) नांगराच्या वतीने शुक्रवार, 07 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास शहरातील मोठा बालाजी मंदिरापासून (Balaji Mandir) सघोष पथसंचलनास सुरुवात झाली.

टोले गल्ली, शेटे गल्ली, पोस्ट ऑफीस, सराफा मार्केट, श्रीराम चौक, अहिल्याबाई होळकर चौक, डाॅ.लेन मार्गे हे संचलन गीता मंडळ येथे आल्यावर सांगता झाली. संचलन मार्गावर ठिकठिकाणी महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढून स्वयंसेवकांवर पुष्पांची वृष्टी करत या पथसंचलनाचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. काली टोपी, दंड संघाच्या संपूर्ण गणवेशात गंगाखेड नगरातील 87 गणवेशधारी स्वयंसेवकांनी या पथसंचलनात सहभाग घेतला. यावेळी, बाल स्वयंसेवकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गीता मंडळ (Geeta Mandal) येथे पोहचल्यानंतर शस्त्रपुजन उत्सव (Shastrapujan Utsav) साजरा करण्यात आला. यावेळी, उत्सवाचे वक्ते, परभणी जिल्हा बौद्धिक प्रमुख  डाॅ. जयेश तळणकर यांचे बौद्धिक झाले. यावेळी शहरातील संघ कार्यकर्ते व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्तित होते.