पुन्हा एकदा राज्यात मोठं जनआंदोलन करण्याची गरज; मविआ सरकारला अण्णा हजारेंचा इशारा

राळेगणसिद्धी – लोकायुक्त कायदा (Lokayukta Act) बनविण्याचं लेखी आश्वासन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिले होतं. मात्र, अडीच वर्षे उलटून देखील त्यावर काहीच होत नसल्याची खंत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी व्यक्त केली. ‘एकतर कायदा करा अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा असा इशारा अण्णा हजारे यांनी ठाकरे सरकारला (Thackeray government) दिला आहे.’

दरम्यान, माध्यमांशी बोलताना आज अण्णा हजारे यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi government) टीकास्त्र सोडले. लोकायुक्त कायदा तयार करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सत्ता कार्यकाळात आश्वासन दिले होते. फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार पायउतार झाल्यानंतर सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारनेदेखील लोकायुक्त कायदा तयार करण्याचे आश्वासन दिले होते. सरकारने लेखी आश्वासन दिले होते. लोकायुक्त कायद्याच्या अनुषंगाने सात बैठकाही पार पडल्या होत्या. आता दोन वर्ष उलटून गेल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर बोलण्यास तयार नसल्याचे अण्णांनी म्हंटल आहे.

या संदर्भात बोलताना ते पुढे म्हणाले की, ‘मुख्यमंत्री यावर बोलायला तयार नाहीत. नेमकं काय झालं हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात मोठं जनआंदोलन (Mass movement) करण्याची गरज आहे असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्यातील 35 जिल्ह्यात आमची कमिटी तयार झाली’ असल्याची माहिती अण्णा हजारे यांनी यावेळी दिली.