मोबिक्विक सिस्टिम्स लिमिटेड कंपनीने (One Mobikwik Systems Limited) आयपीओच्या माध्यमातून खुली समभाग विक्री करण्यासाठी प्राईसबँड प्रतिसमभाग रु. 265/- ते रु. 279/- दरम्यान जाहीर केला आहे. आयपीओ माध्यमातून विक्रीस काढण्यात आलेल्या प्रत्येक समभागाचे फेस व्हॅल्यू रु. 2/- ठेवण्यात आले आहे. मोबिक्विक ही कंपनी ग्राहक व व्यापारी यांच्यासाठी दुहेरी पेमेंट व्यवस्था असलेले एक व्यासपीठ आहे.
मोबिक्विक सिस्टिम्स लिमिटेडची आयपीओ ऑफर बुधवार दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी गुंतवणुकीसाठी खुली होईल आणि शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान 53 समभागांच्या लॉटसाठी व त्यापुढे 53 समभागाच्या पटीत गुंतवणूकीसाठी बोली लावू शकतील. कंपनीचा हा आयपीओ पूर्णत: फ्रेश इश्यू असून त्यायोगे रु. 572 कोटी भांडवल उभारण्यात येणार आहे. यात ऑफर फॉर सेल भागाचा समावेश करण्यात आलेला नाही.
कंपनीच्या या फ्रेश इश्यूमधून उभारल्या जाणाऱ्या भांडवलापैकी रु. 150 कोटी कंपनीच्या वित्तीय सेवा विभागाचा विस्तार करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. तर रु. 135 कोटी कंपनीच्या पेमेंट सेवा व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे रु. 107 कोटी डेटा, एमएल, एआय संशोधन व विकास म्हणजे आर अँड डी कार्यासाठी गुंतविण्यात येणार आहेत. तसेच प्रॉडक्ट व टेक्नॉलॉजीसाठीही या रकमेतून गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रु. 70.28 कोटी पेमेंट डिव्हाईस व्यवसायात भांडवली गुंतवणूक म्हणून वापरण्यात येणार आहेत. तर काही रक्कम सामान्य कॉर्पोरेट हेतुंसाठी वापरण्यात येणार आहे.
बिपिन प्रीत सिंग व उपासना ताकू यांनी पेमेंट सरव्हिस व वित्तीय सेवा देण्याच्या प्रमुख उद्देशानेच वन मोबिक्विक सिस्टिम्स कंपनीची स्थापना केली होती. 30 जून 2024 पर्यंत या व्यासपीठावर तब्बल 161.03 दशलक्ष ग्राहकांची नोंदणी झाली आहे. तसेच 4.26 दशलक्ष व्यापाऱ्यांनी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने या सेवेचा लाभ घेतला आहे. मोबिक्विक कंपनी सातत्याने आपल्या डिजिटल क्रेडिट, गुंतवणूक व विमा व्यवसायात नवनवी उत्पादने सादर करुन ग्राहकांसाठी व्यासपीठाच्या मूल्यात वाढ करत असते. यातून एक व्यापक व नफादायक व्यवस्था निर्माण व्हावी हाच कंपनीचा हेतू आहे. कंपनीच्या या धोरणामुळेच 31 मार्च 2024 रोजी समाप्त आर्थिक वर्षात कंपनीने रु 14.08 कोटी नफा कमावला आहे.
मोबिक्विक सिस्टिम्सने (One Mobikwik Systems Limited) किफायतशीर मार्ग व नाविन्यकरणाच्या माध्यमातून विकास साधण्याप्रती आपली बांधिलकी दाखवून दिली आहे. त्यासाठी कंपनीने विविध प्रकारच्या अनेक उत्पादनांचा पोर्टफोलिओ उभा केला. असे करतांना 2023 वित्तीय वर्षात डिजिटल फायनान्स क्षेत्राच्या महसूलात कर्मचाऱ्यांवरील खर्च किमान राहील याची सातत्याने काळजी घेतली असे रेडसिअर अहवालात नमूद करण्यात आले आहे. कंपनीच्या पेमेंट जीव्हीएम मध्ये वर्षिक 45.88 टक्के दराने वाढ झाली आहे. तसेच मोबिक्विक झीप जीएमव्ही मध्ये तर साल 2022 ते 2024 दरम्यान वार्षिक 112.16 टक्के वाढ झाली आहे.
जून 2024 पर्यंत मोबिक्विकने देशातील 99 टक्के पीन कोड क्षेत्रात आपले ठसठशित अस्तित्व निर्माण केले आहे. मोबिक्विककडे आता 161.03 दशलक्ष नोंदणीकृत गाहक आहेत. यापैकी 70.88 दशलक्ष ग्राहकांची केवायसी पूर्ण असून त्यांनी जीव्हीएम व्यासपीठाच्या माध्यमातून रु. 28,578.25 कोटी रुपये खर्च केले आहेत. तसेच कंपनीने गेल्या वर्षभरात रु.2,346.71 कोटी रुपयांची कर्जवितरण सुविधा उलब्ध केली आहे. यात 34.28 दशलक्ष प्री-ॲप्रुव्हड डिजिटल क्रेडिट यूझर्स आणि 7.27 दशलक्ष ॲक्टिव्ही डिजिटल क्रेडीट यूझर्स चा समावेश आहे. या व्यतिरिक्त मोबिक्विकने ऑथेंटीकेशन एजन्सी (एयूए) म्हणून रु. 6,692.85 कोटींची गुंतवणूक सुरक्षित केली असून त्यासाठी केवळ रु. 33.53 एवढी नाममात्र कस्टमर अक्विझिशन कॉस्ट (सीएसी) अर्थात खर्च मोजला आहे.
एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड, व डीएएम कॅपिटल ॲडव्हायझर्स लमिटेड कंपनी आयपीओ इश्यूच्या लीड मॅनेजर आहेत. तर लींक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या आयपीओची रजिस्ट्रार आहे.
आयपीओ इश्यू बुक रनिंग लीड मॅनेजर पद्धतीने सादरकरण्यात आला असून यात अर्हताप्राप्त संस्थात्मक गुंतवणूकदार अथवा क्यूआयबीसाठी 75 टक्क्यांपेक्षा कमी समभाग उपलब्ध करण्यात येणार नाहीत. तसेच बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 15 टक्यांपेक्षा अधिक समभाग उपलब्ध करण्यात येणार नाहीत. त्याचप्रमाणे किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 10 टक्क्यांपेक्षा अधिक समभाग उपलब्ध करण्यात येणार नाहीत.
संदर्भ सूची:
आपीओचा इश्यू आकार प्राईस बँडच्या उच्च व निम्न टोकांवर आधारित आहे.
फ्रेश इश्यू
लोअर बँड (@ रु. 265) रु. 572 कोटी
अपर बँड (@ रु. 279) रु. 572 कोटी
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना धक्का
“गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी घशात घालून…”, वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी राज ठाकरे मैदानात
पवारांचा खोटारडेपणा म्हणजे संविधानाचा अपमान! बावनकुळे यांची टीका