“एक झाड आईचे” वृक्षारोपण कार्यक्रम दरवर्षी साजरा करणार – Shobhatai R Dhariwal

“एक झाड आईचे” वृक्षारोपण कार्यक्रम दरवर्षी साजरा करणार - Shobhatai R Dhariwal

Shobhatai R Dhariwal | आर एम डी फाऊंडेशन द्वारा दरवर्षी हजारो झाडं संपूर्ण भारतभर लावली जातात. यावर्षीही रांजणगाव, उपलाट तलासरी, वाघोली, दमण ईत्यादी ठिकाणी मोठ्याप्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण करतांना शाळा, महाविद्यालयं, रुग्णालय, सार्वजनिक उद्याने, डोंगर भाग तसेच गायरान ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येते. त्यांना वर्षभर पाणी मिळेल व झाडं जगतील याची काळजी घेतल्या जाते. यापुढे शाळा-महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून “एक झाड आईचे” अशी योजना कार्यान्वीत करीत असल्याची माहिती आर एम डी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई आर धारीवाल (Shobhatai R Dhariwal) यांनी महात्मा गांधी विद्यालय उरळी कांचन येथे दिली.

प्रत्येक विद्यार्थ्याने झाडं लावावी, ती झाडं दत्तक घ्यावी व जगवावी असे आवाहन त्यांनी केले. तसेच महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने 2700 स्वदेशी झाडांचे वितरण व वृक्षारोपण करण्यात आले. वितरीत केलेल्या झाडांची निगा, वाढ व जोपासना केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व योग्य बक्षीस देऊन गौरवण्यात येईल असेही त्या म्हणाल्या. यावेळी शाळेचे विश्वस्त श्री देवीदास भन्साळी यांचेही सहकार्य मिळाले. वृक्षवितरण व वृक्षारोपण वेळी प्राचार्य भोसले, शिक्षक व कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

धीरज घाटेंच्या उमेदवारीबाबतच्या दाव्यावर हेमंत रासने यांनी केले भाष्य, म्हणाले…

लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता, तब्बल 46 हजार कोटींची तरतूद! योजना सुरुच राहणार..

हक्क मागतोय महाराष्ट्र… म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची सरकारविरोधात मोहीम

Previous Post
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या वर्गीकरण आणि क्रिमीलेयरचे काँग्रेस का समर्थन करत आहे? वंचितचा राहुल गांधींना सवाल

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या वर्गीकरण आणि क्रिमीलेयरचे काँग्रेस का समर्थन करत आहे? वंचितचा राहुल गांधींना सवाल

Next Post
‘Ek Zaad Aaiche’ plantation drive will be conducted annually: Shobhatai R Dhariwal

‘Ek Zaad Aaiche’ plantation drive will be conducted annually: Shobhatai R Dhariwal

Related Posts
गिरीश बापट

आयुक्तांच्या घरी पाण्याचे प्रेशर ठीक पण त्यांना इतर प्रेशर जास्त; बापटांचा टोला

पुणे : खासदार गिरीश बापट यांनी रविवारी थेट आयुक्त विक्रमकुमार यांच्या घरावर धडक देत त्यांच्या घरातील पाण्याचा प्रेशर…
Read More
Atul Londhe | मोदी सरकारने गुजरातला कांदा निर्यातीस परवानगी दिली, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय पाप केले?

Atul Londhe | मोदी सरकारने गुजरातला कांदा निर्यातीस परवानगी दिली, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय पाप केले?

Atul Londhe | कांदा निर्यातबंदी करून मोदी सरकारने (Modi Govt) शेतकऱ्यांवर अन्याय केला असून कांदा निर्यातबंदी उठवावी अशी…
Read More
chandrkant patil

पुणे मनपा निवडणुकीसाठी भाजपाची प्रचारात आघाडी; चंद्रकांतदादांचा नव्याने समाविष्ट गावात झंझावाती प्राचार

पुणे – पुणे महापालिका निवडणुकीचं बिगुल आता खऱ्या अर्थाने वाजलं असून, भाजपाने निवडणूक प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष…
Read More