पुणे : मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत जप्त केलेल्या 10 वाहनांचा जाहिर ई-लिलाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे 12 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ठेवण्यात आला आहे.
वाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, मोशी प्राधिकरण पिंपरी चिंचवड येथील आवारात 1 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर 2021 दरम्यान कार्यालयीन वेळेत पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. यात बस, ट्रक, डी.व्हॅन या वाहनांचा समावेश आहे. ई-लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहील. याची वाहन मालक, चालक, वित्तदाते यांनी नोंद घ्यावी.
ई- लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय-पुणे, तहसिलदार, पुणे शहर व हवेली, जुन्नर, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगांव व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय- पिंपरी चिंचवड यांचे सूचना फलकांवर जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आली आहे. इच्छूक व्यक्तींना वाहनांची प्रत्यक्ष पाहणी वाहने अटकावून ठेवलेल्या स्थळी करता येईल.
जाहिर ई- लिलावात सहभागी होण्यासाठी 1 ते 6 ऑक्टोबर 2021 या कालावधीमध्ये www.eauction.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असेल.
ऑनलाईन नाव नोंदणी झाल्या नंतर 1 ते 8 ऑक्टोबर 2021 या कालावधीमध्ये उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे खटला विभागात सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रत्येक वाहनासाठी रु.5 हजार रकमेचा डेप्युटी आरटीओ पिंपरी चिंचवड या नावे अनामत रक्कमेचा धनाकर्षा सह ऑनलाईन सादर केलेल्या कामगदपत्रांच्या प्रती, नाव नोंदणी करणे व कागदपत्रे पडताळणी व मान्यतेसाठी सादर करणे गरजेचे आहे.
लिलावाचे अटी व नियम शुक्रवार 27 सप्टेंबर 2021 पासून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथील नोटीस बोर्डावर सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध राहील. सदर वाहने ‘जशी आहेत तशी’ या तत्वावर जाहिर ई- लिलावाद्वारे विकली जातील.
कोणेतेही कारण न देता सदर जाहिर लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी, पिंपरी चिंचवड यांनी स्वत:कडे राखून ठेवले आहेत, असे कराधान प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांनी कळविले आहे.
हे हि पहा :